शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

मरणासन्न अवस्थेत बिबट आढळला

By admin | Published: December 23, 2016 6:13 PM

बोर व्याघ्र प्रकल्पाच्या सालई (पेवठ) शिवारातील नाल्यात बिबट दिसताच अनेकांची भंबेरी उडाली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. या बिबटाची पाहणी केली असता

ऑनलाइन लोकमत 
बोरधरण, दि. 23- बोर व्याघ्र प्रकल्पाच्या सालई (पेवठ) शिवारातील नाल्यात बिबट दिसताच अनेकांची भंबेरी उडाली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. या बिबटाची पाहणी केली असता तो मरणासन्न अवस्थेत होता. त्याला पिपल्स फॉर अ‍ॅनिमलच्या सदस्यांनी वनविभागाच्या कर्मचा-यांच्या मदतीने वर्धेच्या करूणाश्रमात आणले असून त्याच्यावर येथे उपचार सुरू आहे. 
वर्धेतील पिपरी (मेघे) येथील करूणाश्रमात डॉक्टरांच्या चमूने त्याची तपासणी केली असता त्याच्या शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे दिसून आले. तसेच त्याला डायरीय झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या रक्ताचे नमूने घेतले असून ते तपासणीकरिता पाठविण्यात आल्याचे करूणाश्रमाचे डॉ. संदीप जागे यांनी सांगितले. सध्या बिबटावर करूणाश्रमातील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. 
शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास सालई येथील शेतकरी विश्वनाथ कांबळे शेतात जात असताना त्यांना पुरूषोत्तम सावरकर यांच्या शेतालगतच्या नाल्यात बिबट बसून असल्याचे निर्दशनास आले. पण, बिबट काही हालचाल करत नव्हता. शेतक-याने याची माहिती वन विभागाच्या कार्यालयात भ्रमणध्वनीद्वारे कळविले. हिंगणीचे वनपरिक्षेत्राचे अधिकारी व बोर व्याघ्रचे वनपरीक्षेत्राचे अधिकारी नाल्याजवळ पोहचले. काही काळ त्या बिबटाचे निरीक्षण केल्यावर तो बिबट उभा ही होत नव्हता. त्यामुळे हा जखमी झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला. यावरून पिपल फॉर अनिमल्सला पाचारण करण्यात आले. पिपल्स फौर अ‍ॅनिमलच्या चमुने बिबट पकडण्यासाठी जाळे टाकले. मात्र त्या जाळ्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर त्या बिबटला हाताने उचलून नाल्याच्या बाहेर काढून त्याला वाहनात टाकण्यात आले. तेथूनच उपचारासाठी वर्धेतील पिपरी येथील करूणाश्रमात आणण्यात आले. त्या बिबट्याचे वय अंदाजे ३ वर्षे असल्याचे सांगण्यात आले. गावापासून काही अंतरावर बिबटाचा वावर हा नित्याचा असल्याने शेतकºयासह मजुरामध्ये नेहमी भीतीचे वातावरण आहे. 
सालई, गोहदा, हिंगणी येथील नागरिकांसोबत महिलांची पाहण्याची एकच गर्दी केली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगणीचे पी.एम. झाडे, बोर व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गायनेर, क्षेत्र सहायक हिंगणीचे कावळे, क्षेत्र सहायक बोर व्याघ्रप्रकल्पाचे फाटे, पिपल फॉर अनिमल्स करूणाश्रम वर्धाचे सुमित जैन, कौस्तुभ गावंडे, लखन येवले, सूरज सिंग, मंगेश येनोरकर, पवन दरणे, सालई पेवठ येथील पोलीस पाटील विनोद घाटोळे यांनी बिबट्याला पकडण्याकरिता सहकार्य केले.