मुंबईः अख्ख्या जगाचं लक्ष आज भारतातल्या निवडणुकीकडे लागलं आहे. अनेक ठिकाणी युतीचे उमेदवार पुढे आहेत, तर काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाही अच्छे दिन येण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रातही यंदा बदल होईल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा राज्यात 2014च्या लोकसभा निवडणुकीसारखा निकाल लागण्याची चिन्हे आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघात शिवसेना-भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत. आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी तीन फेऱ्यांचे कल हाती आले असून, कुठे आघाडीचा उमेदवार, कुठे युतीचे उमेदवार पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे आघाडीवर आहेत, तर भिवंडीतून कपिल पाटील आघाडीवर आहेत.आतापर्यंतचे राज्यातील कल हाती आले असून, महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी भाजपाला 22, तर शिवसेनेला 19 जागा मिळण्याचा कल हाती आला आहे. काँग्रेस 1, राष्ट्रवादी 5 आणि बहुजन विकास आघाडीवर आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुकांचा निकाल लवकरच समजणार आहे. गेल्यावेळी म्हणजे 2014मध्ये भाजपाने 26 तर शिवसेनेने 22 जागा लढविल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेनं 18 जागा, तर भाजपानं 23 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदा काय होतं हे लवकरच समजणार आहे.
युतीला अच्छे दिन! राज्यात भाजपा 22, तर शिवसेना 19 जागांवर आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:37 AM