BJP and MVA Manifesto : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीने रविवारी(10 नोव्हेंबर 2024) आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले. एकीकडे भाजपने महिलांना "लाडकी बहीण योजने'द्वारे दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने ‘महालक्ष्मी योजने’अंतर्गत दरमहा 3000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. दोघांनीही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीदेखील जाहीर केली आहे. जाणून घ्या भाजप आणि मआच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे.
- भाजपच्या जाहीरनाम्यात काय?
- 'लाडकी बहीण योजने'अंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये दिले जाणार.- शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल आणि मानधन 15,000 रुपये केले जाईल.- वृद्धापकाळ निवृत्ती वेतन 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात येणार.- 10 लाख विद्यार्थ्यांना मासिक 10,000 रुपये मदत रक्कम दिली जाईल आणि 25 लाख नवीन रोजगार संधी निर्माण होतील.- अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15 हजार रुपये मासिक मानधन मिळेल.- 2027 पर्यंत महाराष्ट्रात 50 लाख 'लखपती दीदी' निर्माण करण्याचे लक्ष्य.- अक्षय अन्न योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना दर महिन्याला मोफत रेशन मिळेल.
- महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात काय?
- 'महालक्ष्मी योजने'अंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये दिले जातील.- महिलांना बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा मिळणार.- गॅस सिलिंडर 500 रुपयांना मिळेल. एका वर्षात 6 सिलिंडर मिळतील.- शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार.- सत्तेत आल्यास महाराष्ट्रात जात जनगणना होईल.- आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त करण्याची योजना.
20 नोव्हेंबर रोजी मतदानमहाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. मात्र, निवडणुकीनंतर पाच वर्षांच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट तयार झाले आहेत. आता यंदाच्या निवडणुकीत दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आहेत. तर, अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे.