मुंबई : सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापू लागले आहेत. भाजपने आक्रमक पवित्रा घेत, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपसह रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि मनसेनेही या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. (bjp and other parties demands president rule in maharashtra over param bir singh letter)
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. भाजपसह अन्य राजकीय पक्षांनी थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. तर भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
सुधीर मुनगंटीवार राज्यपालांच्या भेटीला
राज्यपाल महोदयांनी राज्य सरकार घटनेनुसार चालत नसेल तर त्याची माहिती राष्ट्रपतींना कळवणे गरजेचे आहे, अशी आमची मागणी आहे. आम्ही राज्यपाल यांना भेटणार आहोत. राज्यपालांनी राज्याची माहिती राष्ट्रपतींना कळवावी, अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहोत, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.
राज ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच; देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा
प्रकाश आंबेडकर राज्यपालांच्या भेटीला
मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी १०० कोटी कसे वसूल करायला सांगितले, हे स्पष्ट केलं आहे. हा आकडा आमच्या दृष्टीने कमी आहे. पण हे नेक्सस उभं राहिलेलं आहे. राज्यपालांनी आम्हाला वेळ दिली आहे. हे सरकार बरखास्त करा, अशी मागणी आम्ही करणार आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
रामदास आठवले राज्यपालांना भेटणार
महाराष्ट्रात कायदा सुवस्यवस्था बिघडली असल्याने, राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याच्या मागणीचे पत्र अमित शाह यांच्याकडे देणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी तातडीने मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
हे चोरांचं आणि खुन्यांचं सरकार आहे; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
केंद्राने हस्तक्षेप करण्याची राज ठाकरेंची मागणी
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र हे गंभीर आहेच. पण मूळ प्रश्न अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला कुणी? कुणाच्या आदेशाशिवाय एखाद्या पोलिसाकडून बॉम्ब ठेवण्याचे धाडस होणार नाही. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावा. केंद्रीय तपास संस्थांमार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. यानंतर फटाक्यांच्या माळा लागतील, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले.