भाजपानं 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावांचा समावेश करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढणार असून, चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर परळीतून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना पाहायला मिळणार आहे. पहिल्या यादीनंतर भाजपाने 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
भाजपानं पहिल्या यादीतूनच मुक्ता टिळक यांना कसबा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर अतुल भोसले दक्षिण कराडमधून निवडणूक लढणार आहेत. भाजपाने विद्यमान 11 उमेदवारांच्या आमदारकीचे तिकीट कापले, तसेच 52 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. मात्र, ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसेंचा नाव दुसऱ्या यादीतही नसल्याचं उघड झालं आहे. तर, चंद्रशेखर बावनकुळे यांचंही नाव दुसऱ्या यादीत नसून विनोद तावडेही वेटिंग लिस्टवर आहेत.
भाजपाने आयाराम उमेदवारांना तिकीट दिल्याचं दिसून येतंय. त्यामुळे दुसऱ्या यादीत बारातमी विधानसभा मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता, भाजपाच्या तिसऱ्या आणि अंतिम यादीची प्रतीक्षा महाराष्ट्रातील जनतेला आणि भाजपा कार्यकर्त्यांना लागली आहे.
भाजपाची 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपाचे दुसऱ्या यादीतील 14 उमेदवार
1. साक्री - मोहन सुर्यवंशी2. बारामती - गोपीचंद पडळकर3. अहेरी - अमरिशराजे4. उल्हासनगर - कुमार आयलानी5. केज- नमिता मुंदडा6. मेळघाट - रमेश मावसकर 7. पुसद - निलय नाईक 8. उमरेड - नामदेव ससाणे9. मावळ - संजय भेगडे10. धामणगाव - प्रसाद दादा अडसड11. बागलाण - दिलीप बोरसे12. लातूर शहर - शैलेश लाहोटी13. उदगरी - डॉ. अनिल कांबळे14. गोंदिया - गोपालदास अग्रवाल