मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी तब्बल ४१ जागा जिंकून भाजप-शिवसेना युतीने घवघवीत यश मिळविले. आजवरच्या इतिहासात काँग्रेसचा सर्वात दारूण पराभव झाला असून पक्षाच्या वाट्याला केवळ एक जागा आली. तर राष्ट्रवादी काँग्रेस ४, युवा स्वाभिमानी पक्षाने १ आणि एमआयएमने १ जागा जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा हा विजय आम्ही विधानसभेतही पुढे नेऊ, असा विश्वास युतीच्या विजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाला.माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी ५० हजारावर मतांनी पराभूत केले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडून सोलापुरात दारुण पराभव पत्करावा लागला. काँग्रेसच्या दिग्गज पराभुतांमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचा समावेश आहे. मात्र शिवसेनेतून ऐनवेळी काँग्रेसमध्ये गेलेले सुरेश (बाळू) धानोरकर यांनी चंद्रपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री भाजपचे हंसराज अहीर यांना पराजित करून काँग्रेसचे खाते उघडले.शिवसेनेने १८ जागा जिंकल्या तरी पाच ठिकाणी पराभवाचे मोठे धक्के बसले. त्यात चार विद्यमान खासदारांचा समावेश आहे. रायगडमध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा राष्टÑवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे यांनी पराभव करीत गेल्यावेळच्या पराभवाचे उट्टे काढले.औरंगाबादमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला. अमरावतीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांचा राष्टÑवादी समर्थित युवा स्वाभिमानी पक्षाच्या नवनीत राणा यांनी दारुण पराभव केला. तर शिरुरमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आढळराव पाटील यांचा राष्टÑवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे (अभिनेते) यांना पराभव करून अनेकांचा आश्चर्याचा धक्का दिला. राष्टÑवादीचे उदयनराजे भोसले यांच्यामुळे गाजलेल्या सातारा मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचा पराभव झाला.ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घराण्याच्या वाट्याला पहिल्यांदाच पराभव आला आहे.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्याकडून पराभूत झाले. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड राखत जबरदस्त विजय मिळविला. बारामती आणि चंद्रपूरमध्ये भाजपचा पराभव झाला. अॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला असे दोन्ही ठिकाणी पराभूत झाले. वंचित बहुजन आघाडी काँग्रेस-राष्टÑवादीच्या पराभवास कारणीभूत ठरली.>राज्याचे चित्र असेपक्ष २०१९ २०१४ -/+Ñभाजपा २३ २३ ००शिवसेना १८ १८ ००राष्ट्रवादी ०४ ०४ ००क ाँग्रेस ०१ ०२ -१इतर ०२ ०१ +१
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजप-सेना युतीने उडविला आघाडीचा धुव्वा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 5:33 AM