शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

Maharashtra Politics: “उद्धवजी पंतप्रधान आणि सरदेसाई भारताचे लष्करप्रमुख बनता बनता राहिले”; भाजपचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 5:30 PM

Maharashtra Politics: फेसबुक लाइव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता, असा पलटवार भाजपने केला आहे.

Maharashtra Politics: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हळूहळू सर्वच पक्ष सक्रीय होताना दिसत आहेत. यातच शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष अधिकाधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपही वाढत आहेत. यातच युवासेना नेते वरुण सरदेसाई यांनी एक दावा केला असून, याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील, याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली, असा दावा वरुण सरदेसाईंनी केला. 

उद्धव ठाकरे राज्यात ५ वर्षे मुख्यमंत्री पदावर राहिले तर, २०२४ साली ते पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार होतील, ही भीती असल्यानेच भाजपने सरकार पाडले, असा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला आहे. तसेच, भाजपविरोधी प्रत्येक राज्यात जे पक्ष आहेत, ते पक्ष उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यामागे उभे राहतील हे भाजपला कळून आले होते. म्हणूनच, कुणाला खोके दिले, कोणाला धमकी दिली, अजून काही दिलं आणि आपल्याला पायउतार व्हावे लागले, असा गंभीर आरोप वरुण सरदेसाई यांनी केला आहे. याला भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता

अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले असून,  वरुण सरदेसाई यांनी केलेल्या दाव्यावर पलटवार केला आहे. 'उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली', वरुण सरदेसाईंचा दावा.Hmmmm खरंय, उद्धवजी पंतप्रधान आणि सरदेसाई भारताचे लष्करप्रमुख बनता बनता राहिले... फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. तसेच दुसऱ्या एका ट्विटमध्ये राज्यातील सत्ता गमावली काही दिवसांनंतर महापालिकाही जाणार. टक्केवारी बंद होणार. म्हणून जनाबसेनेच्या पक्षप्रमुखानी कबरींचे सुशोभीकरण करण्याचा व्यवसाय सुरू केलाय असे कळते, अशी टीकाही अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केली आहे. 

दरम्यान, युवासेना एकच आहे. या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आहेत. बाकी कुणाला काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येक गल्लीबोळात अनेक मंडळे असतात. त्यामुळे असे मंडळ स्वत:ला कुणाला स्थापन करावसे वाटत असेल तर त्यांचा विषय आहे असं सांगत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची खिल्ली उडवली. 

टॅग्स :PoliticsराजकारणAtul Bhatkhalkarअतुल भातखळकरVarun Sardesaiवरुण सरदेसाईUddhav Thackerayउद्धव ठाकरे