शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

शिवसेनेच्या कार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार

By admin | Published: June 29, 2016 7:28 PM

भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचे छायाचित्र शिवसैनिकांनी फाडल्यामुळे भाजपा नगरसेवकांनी ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमावर आज बहिष्कार टाकला़

ऑनलाइ लोकमतमुंबई, दि. २९ : भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचे छायाचित्र शिवसैनिकांनी फाडल्यामुळे भाजपा नगरसेवकांनी ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमावर आज बहिष्कार टाकला़ मित्रपक्षाच्या या पावित्र्यामुळे शिवसेनेनेही मवाळ भूमिका घेत भाजपाविरोधात थेट भाष्य करणे टाळले़भाजपाने वर्षभर विरोधी पक्षाची भूमिका वठवत आपल्याच मित्रपक्षाला अनेकवेळा अडचणीत आणले़ नालेसफाई, रस्ते घोटाळे उघड केल्याचे श्रेय घेत भाजपाने शिवसेनेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले़ यामुळे शिवसेना भाजपा युतीमधील वाद चिघळत गेला़ महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर उभय पक्षांनी एकमेकांच्या कार्यक्रमात राडा करण्यास सुरुवात केली आहे़ सोमवारी भगवती रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवसैनिक व भाजपाचे कार्यकर्ते भिडले़ तर मंगळवारी शिवसैनिकांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा व मुंबई अध्यक्ष अ‍ॅड़ आशीष शेलार यांचे पोस्टर्स फाडले़ यामुळे संतापलेले अ‍ॅड़ शेलार आणि भाजपाचे नगरसेवक रेतीबंदर येथील ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात गैरहजर राहिले़ राजशिष्टाचार म्हणून केवळ उपमहापौर अलका केरकर या कार्यक्रमात उपस्थित होत्या़ शिवसेनेचा भाजपाला अप्रत्यक्ष टोलापंपिंग स्टेशनच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांसह भाजपाला अप्रत्यक्ष टोला लगावला़ मुंबईत विकासाच्या नावाखाली चटईक्षेत्र निर्देशांक वाढविण्यासाठी दबाव टाकला जात आहे़ मात्र पायाभूत सुविधांचे नियोजन व त्याच्या उभारणीचा खर्च उचलण्यासाठी कोणी पुढे येत नाही, असा टोला ठाकरे यांनी लगावला़ स्मार्ट सिटी प्रकल्पातून केंद्राने मुंबईला वगळण्याने ठाकरे यांनी हा निशाणा साधला़ थोडी सबुरी ठेवा़नालेसफाईचे काम असमाधाानकारक असल्याने मुंबईत पाणी तुंबणार, अशी शक्यता भाजपाने वर्तविली होती़ मात्र काही लोकांना धीर धरता येत नाही़ त्याआधीच त्यांची टिकाटिपणी सुरु होते़ मोठा पाऊस पडूनही कुठे पाणी तुंबले नाही, असा दावा करीत ठाकरे यांनी भाजपाला अप्रत्यक्ष सुनावले़ मात्र पंपिंग स्टेशनचे थोडे श्रेय भाजपालाही शिवसेनेने आवर्जून देत समतोल ठेवला़बहिष्कार नव्हे निषेधभाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचा आपमान शिवसैनिकांनी केल्यामुळे त्यांच्याबरोबर एका व्यासपीठावर बसणे आता शक्य नाही़ अशी भूमिका घेत भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड़ शेलार उद्घाटन कार्यक्रमात गैरहजर राहिले़ मात्र हा बहिष्कार नसून निषेध असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे़