पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा (Pandharpur Bypoll) पोटनिवडणूक होत आहे. एकीकडे कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना, दुसरीकडे पंढरपूरमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पोटनिवडणुकीनंतर पंढरपूरमध्ये निर्बंध लावण्याविषयी सांगितले. या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली असून, महाविकास आघाडी सरकार पडेल, हे तर आता आठवीतील मुलगाही सांगू शकेल, असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे. (chandrakant patil claims that maha vikas aghadi thackeray govt will collapse soon)
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) आणि भाजपकडून समाधान आवताडे (Samadhan Autade) यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार पडणार असल्याचा दावा केल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ठाकरे सरकार पडणार असल्याचे भाकीत केले आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते.
“पंतप्रधान मोदी प्रचारात मस्त आणि देशातील जनता कोरोनाने त्रस्त”
सरकारकडे काहीच नियोजन नाही
राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. ठाकरे सरकारकडे काहीच नियोजन नाही, प्लानिंग नाही. सरकारमध्ये इच्छा शक्ती कमी आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला जात नाही. इयत्ता आठवीतील मुलगाही राजकीय विश्लेषण करू शकेल. हे सरकार लवकरच पडले. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहोत, असे पाटील यांनी सांगितले.
रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वणवण भटकावे लागत आहे
दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार केलेला दिसत नाही. ऑक्सिजन नसल्यामुळे डॉक्टरांवर रडण्याची वेळ आली आहे. सरकारने आरोग्य यंत्रणेचे काहीच नियोजन दिसत नाही. आमदारांच्या विकास निधीतले चार कोटी काढून दोन कोटी रुपये सरकारला द्यायला हवे होते. तेही केले नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वणवण भटकावे लागत आहे, असा निशाणा पाटील यांनी साधला.
भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण; पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.