मुंबई - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ही दीड लाखांहून अधिक तर मृत्यूची संख्या सात हजारांवर गेल्याने सरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविला असून काही नवीन बंधने टाकली आहेत. लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत देण्यात आलेल्या सवलती, नियमांमधील शिथीलता कायम राहील, असंही या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.
राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार 2 किमीपर्यंत वाहतुकीला परवानगी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?, हे भ्रमित ठाकरे सरकार" असं म्हणत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. "महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?... अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे "भ्रमित ठाकरे" सरकार जनतेला फक्त दोन किमीपर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे" असं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (1 जुलै) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राज्य सरकारने 'मिशन बिगन अगेन' अंतर्गत आधीच्या बऱ्याच सवलती कायम राहतील, असे सोमवारच्या आदेशात स्पष्ट केले आहे. आता अधिक सवलती दिल्या जातील असा अंदाज होता. सरकारने तशी तयारी केलीही होती. परंतु गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने बंधने कायम ठेवताना, काही नवे निर्बंध घातले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
तामिळनाडूच्या लिग्नाइट पॉवर प्लान्टमध्ये बॉयलरचा स्फोट; 6 जणांचा मृत्यू, 17 जखमी
CoronaVirus News : बापरे! '...तर दिवसाला 1 लाख नवे रुग्ण सापडतील'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा
Video - संतापजनक! मास्क लावण्याचा सल्ला दिला म्हणून कार्यालयातील दिव्यांग महिलेला बेदम मारहाण
'प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही फॅशन'; भाजपाच्या 'या' नेत्याने पवारांचं समर्थन करत पडळकरांना सुनावलं