शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

Maharashtra Political Crisis: “महाराष्ट्रात पुन्हा कधीच महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही”; भाजप नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 10:55 PM

Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडीला हरवत आमचे कार्यकर्ते सरपंचापासून महापौरांपर्यंत निवडून येतीलच, असा विश्वासही भाजपकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Political Crisis: एकीकडे आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने आतापासूनच कंबर कसली असून, दुसरीकडे राज्यातील महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या साथीने शिवसेनेसह महाविकास आघाडीला चितपट करण्यासाठी भाजपने प्लान आखण्यास सुरुवात केली असून, महाराष्ट्रात पुन्हा कधीच महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. 

भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मीडियाशी बोलताना सदर दावा केला आहे. उद्धव ठाकरे नैराश्यात बोलत आहेत. त्यांचे मुख्यमंत्री पद गेले आहे. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांचे मुख्यमंत्री पद काढून टाकले आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुका देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही लढू आणि प्रचंड ताकदीने जिंकू. मुंबईत आमचा महापौर असणार, पुण्यात आमचा महापौर असणार. महाराष्ट्रभर आमचेच महापौर असणार. कुठलीही निवडणूक येऊ द्या, नंबर एकचा पक्ष आमचाच असणार, असा दावा बावनकुळे यांनी केला. 

महाराष्ट्रात पुन्हा कधीच महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही

महाराष्ट्रातील दोनशेच्यावर आमदार आम्ही निवडून आणणार. महाराष्ट्रात पुन्हा कधीच महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही. महाविकास आघाडीला हरवत आमचे कार्यकर्ते सरपंचापासून महापौरांपर्यंत निवडून येतीलच, असाही दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान मोदीजींचे कर्तृत्व आणि नेतृत्व खूप मोठे आहे. त्यांना १५० देशांमध्ये लोकप्रियता मिळाली आहे. मोदींना जग विश्वगुरू म्हणून बघते. अशा नेत्याची तुम्ही बरोबरी करू शकत नाहीत. ज्यांचे दहाच्यावर खासदार निवडून येत नाहीत, ज्यांचे साठच्यावर आमदार निवडून येत नाहीत. ते दिवसा स्वप्न बघायला लागले आहेत. शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नादी लागू नये. मोदी हे खूप मोठे नेते आहेत, असा एल्गार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते मीडियाशी बोलत होते.

मोदींना भेटल्यावर एखाद्या महापुरुषाला भेटल्यासारखे वाटते

पंतप्रधान मोदीजींना सहपरिवार भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला २२ मिनिटे वेळ देत माझ्यासोबत आपुलकीने संवाद साधला. ती माझ्यासाठी आयुष्यभराची पुंजी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यावर एखाद्या महापुरुषाला भेटल्यासारखे वाटते. हे मी अनुभवले आहे. भाजपच्या नेतृत्वाने समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचवण्याचे काम केले. पक्षाच्या त्या खुर्चीवर बसण्याचा मान दिला. पक्षाचा आभारी आहे. माझ्यावर सगळ्या निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली आहे. ती जबाबदारी पार पडणार, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या कितीही भेटी होऊ द्या. काही फरक पडत नाही. तिसरी, चौथी, पाचवी कुठलीही आघाडी केली तरी ती आघाडी त्यांना लखलाभ असो. नितीश कुमार यांना मिळालेले मुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीची कृपा आहे. नितीश कुमार यांनी दगाबाजी केली. इकडे उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केली. तिकडे त्यांनी केली. आम्ही दगाबाजांना त्यांची जागा दाखवून देणार, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी