काँग्रेसची राष्ट्रपती राजवटीची मागणी; बावनकुळे म्हणाले, “पुढे सत्ता येणार नाही म्हणून...”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 06:01 PM2023-07-13T18:01:07+5:302023-07-13T18:03:46+5:30

Chandrashekhar Bawankule: काँग्रेस आमदार भाजपात येण्याची भीती वाटत असल्याने अशी विधाने केली जात आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

bjp chandrashekhar bawankule reaction over congress demand for president rule in maharashtra | काँग्रेसची राष्ट्रपती राजवटीची मागणी; बावनकुळे म्हणाले, “पुढे सत्ता येणार नाही म्हणून...”

काँग्रेसची राष्ट्रपती राजवटीची मागणी; बावनकुळे म्हणाले, “पुढे सत्ता येणार नाही म्हणून...”

googlenewsNext

Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्रात भाजपने दोन मोठ्या विरोधी पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवारांसह ३० हून अधिक आमदार भाजपसोबत सरकारमध्ये आहेत. महाराष्ट्र भाजपची बैठक बोलावण्यात आली होती.  यामध्ये आगामी निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्यात महायुतीच्या २२० जागा निवडून येतील. महाविजय २०२४ चा आम्ही संकल्प केला आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्रात भाजपची घोडदौड प्रचंड ताकदीने सुरु राहणार आहे. पार्लियामेंट ते पंचायतपर्यंत आम्ही काम करीत असून येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजप क्रमांक एकवर राहील आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत जो आम्ही नंबर गाठला नाही तो नंबर आमची महायुती गाठेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी. राज्यपाल, राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

सत्ता गेली आहे व पुढे सत्ता येणार नाही

काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात अस्वस्था निर्माण झाली आहे. सत्ता गेली आहे व पुढे सत्ता येणार नाही. यामुळे नाना पटोले आपल्या संघटनेला व आमदारांना धौर्य देण्यासाठी राष्ट्रपती  राजवट लागणार असल्याचे वक्तव्य करीत आहेत. काँग्रेस आमदार भाजपात येतील, अशी भीतीही त्यांना वाटत असल्याचा टोला बावनकुळे यांनी लगावला.

दरम्यान, आम्ही महाराष्ट्राचे गणित आखले आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपसोबत आले आहेत. आम्ही सर्व जण मिळूण आमचे टार्गेट पूर्ण करणार आहोत. एकूण २८८ विधानसभापैकी महायुतीमध्ये आम्हाला ज्या जागा मिळतील, त्यापैकी ८० टक्के जागांवर आमचा विजय होईल. म्हणजे १५२ जागांवर आम्ही विजयी होऊ. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुती २०० हून अधिक जागांवर विजयी होईल. जागावाटपावरून एनडीएमध्ये वाद होणार नाही, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 


 

Web Title: bjp chandrashekhar bawankule reaction over congress demand for president rule in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.