शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

"या निवडणुकीत जनता तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही," भाजपाची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 3:10 PM

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray, BJP: उद्धव ठाकरेंना भाजपाचे चोख प्रत्युत्तर, देवेंद्र फडणवीसांवर केला होता आरोप

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray, BJP : लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नुकताच स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांच्या जीवनावर आधारित Swatantra Veer Savarkar नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवासांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर राहुल गांधी टोला लगावला. सावरकर यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या राहुल गांधींना ( Rahul Gandhi ) फडणवीसांनी टोला लगावला होता. त्याबाबत प्रश्न विचारताच, शिवसेना उबाठा पक्षाचे उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोमणा मारला होता. त्यावर आता भाजपानेही प्रत्युत्तर दिले आहे.

फडणवीसांचा वार, ठाकरेंचा पलटवार

देवेंद्र फडणवीस म्हणाले- "राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वाचलं नाही किंवा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. मी राहुल गांधींसाठी माझ्या पैशाने त्यांच्या एकट्यासाठी संपूर्ण थिएटर बूक करेन आणि त्यांना सिनेमा पाहण्याचे आवाहन करेन. यामुळे कदाचित मग ते सावरकरांबद्दल निराधार विधाने करणे थांबवतील." फडणवीसांनी केलेल्या टीकेबद्दल ठाकरे टोला लगावत म्हणाले- "मी देवेंद्र फडणवीसांचा पूर्ण जाण्याचा येण्याचा खर्च करतो, त्यांचा हॉटेलचा खर्च करतो त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावे. बॉलीवुडची मंडळी राजकारणात येत आहेत. तर एखाद्या निर्मात्याला सोबत घेऊन फडणवीसांनी मणिपूर फाइल्स हा चित्रपट काढावा."

हे नक्की वाचा: "मी देवेंद्र फडणवीसांचा जाण्या-येण्याचा, हॉटेलचा खर्च करतो, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंचे उपमुख्यमंत्र्यांना 'चॅलेंज'

भाजपाचे ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या टोमण्याला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले. "मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित ‘ठगों का मेला‘ कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते आणि टोमणेसम्राट उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला. देवेंद्र फडणवीस यांनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर ‘१०० कोटी वसुली फाईल्स‘ची स्क्रिप्ट तयार आहे. त्याची काळजी उद्धव ठाकरेंनी करू नये. याशिवाय ‘वाझे की लादेन फाईल्स‘, ‘खिचडी फाईल्स‘, ‘कोविड बॅग फाईल्स‘ असे अनेक चित्रपट काढता येतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी टोमणे मारण्यापूर्वी घरात बसून केलेल्या अडीच वर्षाच्या कारभाराचा विचार करावा. बाकी तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना कितीही टोमणे मारले तरी महाराष्ट्रातील जनता लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही," अशी खरमरीत टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर वाबनकुळे यांनी केली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे