मुंबई - महाविकास आघाडीत काय होतंय त्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही जनतेपर्यंत पोहचतोय. लोकांच्या घरोघरी जातोय. विरोधकांच्या बैठकीत काय होते हे पाहत नाही. महाराष्ट्रात २ पक्षांचे काय झाले. २०२४ जसजसं जवळ येईल तसतसं विरोधकांची आघाडीचे तुकडे होतील. जे स्वत:चे घर सांभाळू शकत नाहीत ते आरोप करतात. देशाचा मोदींवर विश्वास आहे. आम्हाला कोणाचं घर तोडण्याची गरज नाही. घर जोडून ठेवण्यासाठी मोठे हृदय लागते. घर सांभाळण्याची क्षमता असायला हवी. तुम्ही तुमचे घर मजबूत ठेवाल तर कोण तोडेल. तुमचं घर सांभाळून ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना फटकारलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्या नेत्यांनी शरद पवारांना मजबूत करण्यासाठी आजही मोदींच्या नेतृत्वात अजित पवारांसह सर्व शरद पवारांचा फोटो लावून काम करतात. त्याचा तरी विचार शरद पवारांनी करा. आजही त्यांची निष्ठा शरद पवारांकडे आहे. ज्यांनी मला मोठे करण्यासाठी ३०-५० वर्ष दिले. त्या कार्यकर्त्याविरोधात मतदारसंघात बोलणे, ही वेळच येऊ नये. अशी वेळ आली तर शरद पवारांसारख्या नेत्यांनी त्यांची उंची कमी करू नये. कालपर्यंत तुम्हाला मोठे करण्यासाठी, नेतृत्व देण्यासाठी हे छोटे कार्यकर्ते उभे राहिले. परंतु देशहितासाठी त्यांनी जी भूमिका घेतली. त्यांच्याविरोधात गरळ ओकणं हे शरद पवारांना शोभण्यासारखे नाही. ज्यांनी अजूनही शरद पवारांवरील निष्ठा सोडली नाही. शरद पवारांनीही याचा विचार करायला हवा. त्यामुळे अशा मतदारसंघात जाऊन सभा घेऊ नये असं आम्हाला वाटते. परंतु निर्णय शरद पवारांचा आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय आम्ही पाठीत खंजीर खुपसला नाही. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पाठित खंजीर खुपसला गेला. इथं पाठिंबा दिलाय. एकनाथ शिंदे यांनी युतीची भूमिका ठरवली. अजित पवारांनी देशाच्या कल्याणासाठी निर्णय घेतलाय. त्यामुळे आम्ही खंजीर खुपसला नाही. खंजीर खुपसण्याचा आमच्या रक्तात नाही. हे त्यांना लखलाभ आहे.जे संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवारांना लखलाभ आहे. शरद पवारांच्या पाठिशी जे उभे राहिले त्यांनी एखादी भूमिका घेतली. त्यात अजित पवारांसह इतके लोकं आहेत. देशासाठी साथ देण्यासाठी येतायेत. तर त्यांच्या मतदारसंघात त्यांच्यावर टीका करणे हे योग्य नाही. शरद पवारांनी विचार करावा असा सल्लाही बावनकुळेंनी दिला आहे.
दरम्यान, मोदींनी ज्यारितीने ९ वर्ष काम केले आहे. २०२४ च्या निवडणुकीत देशाला मजबूत करण्यासाठी मतदान होईल. २०२४ मध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडला जाईल. देशातील प्रत्येक नागरीक नरेंद्र मोदींना मतदान करेल. ९ वर्ष मोदींनी कार्यकाळ पूर्ण केला. त्यांनी एक दिवसही सुट्टी घेतली नाही. जीवनात कधीही तडजोड केले. संपूर्ण आयुष्य देशासाठी दिले. ज्या बँकेवर लोकांचा विश्वास तिथेच पैसे ठेवले जातात. ८ कोटी राज्यातील जनतेपर्यंत विकास पोहचवला. लोकं कामाला मतदान देतात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बुथवर ५१ टक्क्याहून अधिक मते मोदींना मिळतील त्याचा अहवाल शरद पवारांना पाठवून देऊ असा चिमटा भाजपाने काढला.
मोदी २०१९ पर्यंत झेंडावंदन करतील. भाजपा २०४७ पर्यंत देशात झेंडावंदन करतील. पृथ्वीराज चव्हाणांना मुख्यमंत्रिपदावरून खाली खाली यावे लागलंय. प्रतोद, विधिमंडळ गटनेता, विरोधी पक्षनेते कुठल्याच पदासाठी त्यांचे नाव पुढे येत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांचे राजकीय भवितव्य पाहता त्यांच्यावर कुठलीच जबाबदारी पक्षाकडून दिली जात नाही. त्यामुळे अशा मानसिकतेत त्यांच्याकडून टीका करणे स्वाभाविक आहे अशा शब्दात बावनकुळेंनी पृथ्वीराज चव्हाणांना टोला लगावला.
राज ठाकरेंना प्रत्युत्तर
१९८४ मध्ये भाजपा २ जागांवर होती, आज ३०३ वर पोहचली. इतके बहुमत कुठल्याही पक्षाला मागच्या २० वर्षात कुणाला मिळाले. पक्ष वाढवण्यासाठी संवाद, प्रवास करावा लागतो. १८-१८ तास काम करावे लागते. भाजपाचे कार्यकर्ते सन्यासी नाही. राजकीय पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आहे. भाजपवर लोकांचा विश्वास आहे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. अशावेळी जर कुणी पक्षात येण्याची विनंती केली तर आमचा दुपट्टा तयार आहे. आमच्याशी अनेकदा देशात, राज्यात बेईमानी झालीय. बेईमानी झालीय हे जनतेला कळाले आहे. त्यामुळे राज्याला नंबर १ कोण घेऊन जाऊ शकते तर भाजपा सरकार आहे. म्हणून जनतेचा विश्वास वाढतो. आमदार वाढतयेत. आम्हाला फोडाफोडी करण्याची गरज नाही. भाजपाचा संवाद, प्रवास राज ठाकरेंनी समजून घेतला तर ते पुढे बोलणार नाही असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंना दिले.