Chitra Wagh : "हे अधीर की बधीर?, हा केवळ मूर्खपणा नाही यामागे अत्यंत..."; भाजपाची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 03:39 PM2022-07-28T15:39:00+5:302022-07-28T15:46:23+5:30
BJP Chitra Wagh Slams Congress Adhir Ranjan Chowdhury : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस आणि अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मुंबई - काँग्रेसचे लोकसभेतील खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केल्याने राजकारण तापलं आहे. लोकसभेमध्ये गोंधळ उडाला. द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत एका व्हिडीओमध्ये बोलताना राष्ट्राची पत्नी असा शब्दप्रयोग चौधरी यांनी केला होता. यावरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील टीका केली आहे. या साऱ्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. माफी मागण्याच्या मागणीवरून अधीर रंजन चौधरी यांनी माझ्याकडून चुकून राष्ट्राची पत्नी असा शब्द निघाला. एकदा चूक झाली तर मी काय करू? यावरून मला फासावर लटकवायचे असेल तर लटकवा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांच्या या प्रतिक्रियेवरून भाजपाने बोचरी टीका केली आहे. "असे सेल्फगोल करणारे नेते असतील तर कल्याणच आहे, हे अधीर की बधीर?" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी काँग्रेस आणि चौधरी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी महामहिम राष्ट्रपती यांचा ' राष्ट्रपत्नी' असा मुर्खपणाने उल्लेख करून भोचकगिरी केली आहे चुकून बोललो, आता फाशी देता का मला, हे त्यावरचे अधीर यांचे उत्तर अधिक संतापजनक आहे. असे सेल्फगोल करणारे नेते असतील तर कल्याणच आहे, हे अधीर की बधीर?" असं म्हटलं आहे
लोकसभेतील @INCIndia चे गटनेते @adhirrcinc यांनी महामहिम राष्ट्रपती यांचा ' राष्ट्रपत्नी' असा मुर्खपणाने उल्लेख करून भोचकगिरी केली आहे चुकून बोललो, आता फाशी देता का मला,हे त्यावरचे अधीर यांचे उत्तर अधिक संतापजनक आहे.
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 28, 2022
असे सेल्फगोल करणारे नेते असतील तर कल्याणच आहे
हे अधीर की बधीर.? pic.twitter.com/Etztcf793D
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत दोन ट्विट केलं आहे. "एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेली काँग्रेसला का पाहवत नाही? त्यातूनच काँग्रेस गट नेते अधीर रंजन चौधरी यांनी महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मर्मू यांचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केला. हा केवळ मूर्खपणा नाही यामागे अत्यंत हलकट मानसिकता आहे" असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. भाजपाने काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली असून चौधरी यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे. काही भाजपा नेत्यांनी चौधरी यांचे वक्तव्य माफी मागण्या लायक नसल्याचे म्हटले आहे.
एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेली काँग्रेसला का पाहवत नाही ? त्यातूनच काँग्रेस गट नेते अधीर रंजन चौधरी यांनी महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मर्मू यांचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केला. हा केवळ मूर्खपणा नाही या मागे अत्यंत हलकट मानसिकता आहे..@BJP4Maharashtra
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 28, 2022
स्मृती इराणींचे 'ते' शब्द सोनिया गांधींना झोंबले; एवढ्या भडकल्या की...
गुरुवारी संसदेचे कामकाज सुरू होताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (BJP Smriti Irani) यांनी चौधरींविरोधात मोर्चा उघडला. काँग्रेस पक्ष आदिवासी महिलेचा सन्मान सहन करू शकत नाहीय, असे त्या म्हणाल्या. स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोनिया गांधी (Congress Sonia Gandhi) यांनी याप्रकरणी माफी मागावी असं म्हटलं आहे. याच दरम्यान स्मृती इराणी आणि सोनिया गांधी यांच्यात वाद रंगलेला पाहायला मिळाला. इराणी यांच्या विधानावर सोनिया चांगल्याच संतापल्या आणि Dont talk to me असं म्हणून निघून गेल्या आहेत.