"प्रियंका गांधी पुण्याच्या घटनेवर गप्प का?, ती तुमच्या मुलीसमान नाहीये का?"; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 10:34 AM2021-10-13T10:34:12+5:302021-10-13T10:36:22+5:30
BJP Chitra Wagh And Congress Priyanka Gandhi : चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. त्यांनी ठाकरे सरकारवर आणि प्रियंका गांधींवर टीका केली आहे.
पुणे शहरातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवीमध्ये शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय मुलीचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण पुणे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. बिबेवाडीचा यश लॉन्स परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "आपल्या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत. यांच्यासाठी सरकार कधी करतंय महाराष्ट्र बंद?" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींवरही टीकास्त्र सोडलं आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यांनी ठाकरे सरकारवर आणि प्रियंका गांधींवर टीका केली आहे. "अतिशय भयानक, काय चाललयं पुण्यात कोयत्याने वार करून खून, टाईप करतानाही अंगावर काटा येतोय काय भोगलं असेल तिने, कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर, पोलीस कायदे कागदावर... महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्रबंद??" असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमधून विचारला आहे.
अतिशय भयानक 😳
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 12, 2021
काय चाललयं पुण्यात
कोयत्याने वार करून खून
टाईप करतांनाही अंगावर काटा येतोय काय भोगलं असेल तीने
कायदा सुव्यवस्था वार्यावर
पोलिस कायदे कागदावर
महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्रबंद ?? @CMOMaharashtrapic.twitter.com/vXLF08U5jY
चित्रा वाघ यांनी आणखी एक ट्वीट करत प्रियंका गांधींवर (Congress Priyanka Gandhi) हल्लाबोल केला आहे. "हाथरसच्या घटनेवर तुम्हाला अश्रू अनावर झाले मग पुण्याच्या घटनेवर गप्प का?" असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. पुण्यातील ज्या तरुणीची हत्या झाली ती तुमच्या मुलीसमान नाहीये का? फक्त निवडणुका लागलेल्या उत्तर प्रदेशातच तुमच्या संवेदना जागृत होतात का?, सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
प्रियांका जी
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 12, 2021
हाथरस की घटना पर आपने आंसू बहाए
लेकीन पुणे घटना पर चुप क्यों है?
पुणे में जिस बच्ची की हत्या हुई
वो आपकी बेटी समान नहीं है क्या?
या सिर्फ चुनाववाले युपी में ही
आपकी संवेदनाऐं जागृत होती है!
कहाँ है #MVA की कानून व्यवस्था ?@priyankagandhi
जवाब दो.. न्याय दो !
पुणे हादरले! कबड्डीचा सराव करताना केला 14 वर्षीय मुलीचा कोयत्याने वार करून खून
क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. ती कबड्डीपटू होती. ती मित्र मैत्रिणीसोबत कबड्डीचा सराव करत होती. ज्या वेळी त्या ठिकाणी आलेल्या एका तरुणाने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि सोबत आणलेल्या कोयत्याने आरोपीने क्षितिजाच्या गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या क्षितीजाचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपीने अत्यंत क्रूरपणे हा गुन्हा केलाय. त्यानंतर त्याने घटनास्थळीच कोयता आणि सोबत आणले शस्त्र टाकून देऊन पळ काढला. दरम्यान आरोपी जवळ पिस्तूल देतील असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु गुन्हा करत असताना त्याला ते काढता आले नाही. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.