केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर काळात संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्या अमृत कालाशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा केली आहे. परंतु कुठलाही निश्चित अजेंडा समोर आला नाही. त्यामुळे विविध चर्चा सुरू आहेत. विशेष अधिवेशनात एक देश एक निवडणूक, महिला आरक्षण विधेयक आणि इंडियाऐवजी भारत यासारख्या विधेयक अथवा प्रस्ताव आणले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून दावा केला आहे.
जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये जी-२० संमेलनासाठी ज्यांना डिनरसाठी निमंत्रित केले आहे ज्यात प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. ही बातमी खरीच आहे. राष्ट्रपती भवनात ९ सप्टेंबरवर जी-२० संमेलनाच्या डिनरसाठी निमंत्रण पत्रिका पाठवली आहे. त्यात प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख आहे. जर संविधानाचे कलम १ वाचले तर त्यात भारत जो इंडिया आहे एका राज्यांचा संघ असेल. आता संघराज्याला धोका निर्माण झाला आहे असा आरोप त्यांनी केला. यावरून भाजपाने टोला लगावला आहे.
"विरोधी पक्षांनो, यात्राही 'भारत' जोडो नावानेच काढली होती ना? मग तुमचं काळीज का धडधडतंय?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "जगातली सगळ्यात प्राचीन संस्कृती 'भारत' हीच आहे. हे नावच देशवासीयांची ओळख, अभिमान आणि गर्व आहे. त्याच नावाची पुन:स्थापना होते आहे, ही बाब सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. विरोधी पक्षांनो, यात्राही 'भारत' जोडो नावानेच काढली होती ना? मग तुमचं काळीज का धडधडतंय? अभिमानाने म्हणा, मेरा भारत महान!" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
जर इंडिया आणि भारत नावाची चर्चा सुरू आहे तर संविधानात ज्या ज्या ठिकाणी इंडिया शब्दाचा वापर आहे तिथे भारत केले जाणार आहे. याबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सर्वात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं होतं की, आपल्या देशाचे खूप वर्षाआधी भारत असं नाव होते. त्यामुळे याला इंडिया असं बोलायला नको. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा काही खासदारांनी उपस्थित केला होता. त्यामुळे विशेष अधिवेशनात याबाबत काही प्रस्ताव अथवा विधेयक आणलं जातंय का हे पाहणे गरजेचे आहे.