मुंबई - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत.शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सद्य राजकीय घडामोडींवर सडेतोड पण भाष्य केले. या मुलाखतीवरून भाजपाने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"काय ते प्रश्न, काय ती उत्तरं, काय ती घरातल्या घरातली मुलाखत, कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. "मागील अडीच वर्षातल्या कर्तृत्वाच्या चार गोष्टी माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या असत्या तर लोकांनाही ऐकायला बऱ्या वाटल्या असत्या… पण तिथे वसूली शिवाय काहीच नव्हतं…" असं म्हणत चित्रा वाघ यांनी बोचरी टीका केली आहे.
"स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्या आणि हिंदू आतंकवादाची संकल्पना मांडणाऱ्या काँग्रेस नि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो हे ही आमचे हिंदुत्व म्हणूनही सांगा ना…" असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. "मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या पक्षाच्या विरोधात जोरदार हालचाली सुरू होत्या" असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. यावर आता शिंदेगटाच्या आमदाराने प्रतिक्रिया दिली आहे. बंडखोर आमदाराने उद्धव ठाकरेंनी केलेला आरोप फेटाळून लावला आहे. "उद्धव ठाकरे हे आजारी असताना बंड केलं असं म्हणाले हे साफ खोटं आहे" असं म्हटलं आहे.
"आजारी असताना बंड केलं म्हणाले हे खोटं"; बंडखोर आमदाराने फेटाळला उद्धव ठाकरेंचा आरोप
आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी असं म्हटलं आहे. "सत्तेत जाण्यासाठी शिंदे साहेबांनी हा उठाव केला नव्हता. त्यांच्याकडे नगरविकाससारखं महत्त्वाचं खातं आहे. मी आजारी असताना घडलेला हा प्रकार केल्याचं उद्धव ठाकरे सांगत आहेत. हे खोटं आहे. आम्ही त्यांच्या प्रकृतीसाठी अभिषेक केला. ही दोन वर्षांपासूनची प्रक्रिया आहे. ते बरे झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्हाला नको आहेत, असं आम्ही म्हटलं. पण आजही मुलाखतीतून त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच मोठं म्हटलंय, याचं वाईट वाटतं" असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.