शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

भाजपा नगरसेवकाला लाच घेताना अटक

By admin | Published: October 05, 2016 5:22 AM

घरदुरुस्तीच्या वेळी केलेल्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक ४४ नेतीवली टेकडी येथील भाजपा

कल्याण : घरदुरुस्तीच्या वेळी केलेल्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक ४४ नेतीवली टेकडी येथील भाजपा नगरसेवक गणेश तुकाराम भाने याच्यासह त्याच्या एका साथीदाराला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कल्याणमध्ये मुद्देमालासह अटक केली.भाने याच्या प्रभागातील एका महिलेच्या घराची काही दिवसांपूर्वी पडझड झाली होती. तिने घरदुरुस्तीचे काम कंत्राटदार खान यांना दिले होते. पण दुरुस्ती करताना केलेल्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी भाने याने कंत्राटदाराकडे १ लाख २० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती १ लाख रुपये देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार मंगळवारी सकाळी तिसगाव नाक्याजवळ गाडीत १ लाख रुपये घेताना भाने याच्यासह त्याचा साथीदार श्रीकांत नागरेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह पकडले. या प्रकरणी स्थानिक कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. भाजपा नगरसेवकाला लाच घेताना पकडल्याने महापालिका वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. (प्रतिनिधी)