“समाजाला विसर पडतो, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात”; फडणवीसांनी मानले आभार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 08:21 PM2023-05-27T20:21:57+5:302023-05-27T20:23:00+5:30

Devendra Fadnavis: हे तुम्ही सत्य बोलता, त्याबद्दलही तुमचे आभार मानतो, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

bjp dcm devendra fadnavis slams congress rahul gandhi over veer savarkar row | “समाजाला विसर पडतो, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात”; फडणवीसांनी मानले आभार!

“समाजाला विसर पडतो, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात”; फडणवीसांनी मानले आभार!

googlenewsNext

Devendra Fadnavis: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या विधानांमुळे देशभरात वाद निर्माण झालेला पाहायला मिळत आहेत. मात्र, यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. समाजाला विसर पडतो, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर लिहिलेल्या ‘मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. लेखक शुभांगी भडभडे लिखित या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी जेव्हा ‘मी सावरकर नाही’ असे म्हणतात. तेव्हा नागपुरी भाषेत म्हणायची इच्छा होते की, सावरकर बनण्याची तुमची औकात नाही, म्हणजेच क्षमताही नाही. सोन्याचा चमचा घेऊन जे जन्माला आले, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. 

राहुल गांधी यांचे आभार मानले पाहिजे

राहुल गांधी यांचे आभार मानले पाहिजे. कारण, जेव्हा समाजाला सावरकरांचा विसर पडतो, असे वाटते, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात. त्यामुळे संपूर्ण समाज पेटून उठतो आणि पुन्हा एकदा सावरकरांचं विचार जनसामान्य आणि पुढील पिढीपर्यंत नेण्याची संधी आपल्याला मिळते, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. याशिवाय, राहुल गांधी जन्मात सावरकर होऊ शकत नाहीत. त्यामुळे ‘मी सावरकर नाही’ हे तुम्ही सत्य बोलता, त्याबद्दलही तुमचे आभार मानतो, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, ‘महापौर’ आणि ‘विधानमंडळ’ असे शब्द वीर सावरकरांनी दिले. एक विज्ञाननिष्ठ आणि आपल्या संस्कृतीला आव्हान देऊन चांगले स्वीकारण्याचा आग्रह धरणारा तेजस्वी नेता म्हणून आपण सावरकरांकडे पाहिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपल्याला पिढी दर पिढी पुढे पोहचवावे लागेल. कारण, काँग्रेसने सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी बोस यांना नाकारण्याचे काम केल, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.
 

Web Title: bjp dcm devendra fadnavis slams congress rahul gandhi over veer savarkar row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.