Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सक्रीय; शिवसेनेनंतर आता दोन्ही काँग्रेस लक्ष्य! ४ बड्या नेत्यांशी संपर्क? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 11:28 AM2022-07-28T11:28:35+5:302022-07-28T11:30:35+5:30

Maharashtra Political Crisis: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील काही बडे नेते गळाला लावण्यासाठी भाजपसह शिंदे गट सक्रीय झाल्याचे सांगितले जात आहे.

bjp devendra fadnavis and eknath shinde group now trying to pull congress and ncp leaders to their party | Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सक्रीय; शिवसेनेनंतर आता दोन्ही काँग्रेस लक्ष्य! ४ बड्या नेत्यांशी संपर्क? 

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सक्रीय; शिवसेनेनंतर आता दोन्ही काँग्रेस लक्ष्य! ४ बड्या नेत्यांशी संपर्क? 

Next

Maharashtra Political Crisis: एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पक्षाला पडलेले भगदाड सावरण्यासाठी डॅमेज कंट्रोल करण्याचे आटोकाट प्रयत्न करत असताना, आता दुसरीकडे एकनाथ शिंदे गट आणि भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांच्या संपर्क साधत असून, त्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यभरातून अनेकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने त्यांची ताकद वाढत चालली असून, शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार आणि आमदारांना आपल्या तंबूत घेण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले. त्यामुळे या भागात आणखी हातपाय पसरण्यासाठी दोन्ही काँग्रेसमधील काही नेत्यांना बंडखोरी करायला लावण्यात आता शिंदे गट सक्रीय झाला आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूरचे दोन नेते गळाला लागल्याची चर्चा सुरू असतानाच आता सांगली आणि कोल्हापूरच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. गेल्या सात आठ वर्षात भाजपने दोन्ही काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या हातात कमळ दिले. यातील काहीजण खासदार तर काही आमदारही झाले. सत्ता गेल्यानंतर भाजप प्रवेशाचा धडाका कमी झाला. 

भाजप आणि शिंदे गट नेत्यांना आपल्याकडे घेण्यासाठी सक्रीय

राज्यात सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गट दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांना आपल्या तंबुत घेण्यासाठी सक्रीय झाला आहे. याचाच एक भाग म्हणून आमदार बबन शिंदे व माजी आमदार राजन पाटील यांची नावे चर्चेत आली आहेत. दोन वर्षातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला टक्कर देत विजयाचा झेंडा फडकवू शकणारे अथवा फडकविण्यास हातभार लावू शकणारे नेते आता भाजपला हवे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. 

दरम्यान, कोल्हापुरात माजी आमदार चंद्रदीप नरके आणि सुजित मिणचेकर यांची नावे भाजप प्रवेशाच्या चर्चेत आहेत. सांगली जिल्ह्यातील काही नेते भाजपच्या मार्गावर आहेत. सातारा जिल्ह्यात पक्षात घेण्यासारखा मोठा नेता राहिलेला नाही. तरीही विधानसभा निवडणुकीत मदत होईल, असे प्रमुख कार्यकर्ते हेरण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: bjp devendra fadnavis and eknath shinde group now trying to pull congress and ncp leaders to their party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.