पिंपरी : महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करुन एकहाती विजय मिळविलेल्या भाजपाला झालेल्या एकूण मतांपैकी ३७ टक्के मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला २८ टक्के मते मिळाली आहेत. शिवसेनेला १६ टक्के, तर काँगे्रसच्या पारड्यात अवघी तीन टक्के मते पडली आहेत. या निवडणुकीत काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना यासह सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र लढले. दरम्यान, भाजपाला राष्ट्रवादीच्या हातातील सत्ता खेचण्यात यश आले. या निवडणुकीत भाजपाने १२८ जागांपैकी तब्बल ७७ जागांवर विजय मिळविला, तर राष्ट्रवादीला अवघ्या ३६ जागांवर समाधान मानावे लागले. मागील पंचवार्षिकमध्ये अवघे तीन नगरसेवक असलेल्या भाजपाचे संख्याबळ ७७ वर पोहोचले आहे. यासह एकूण मतांमध्ये भाजपाच्या मतांची टक्केवारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांनी प्रथमच सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते़ भाजपाला एकूण ११ लाख ५३ हजार ६० मते मिळाली म्हणजेच ३७.२ टक्के मते मिळाली आहेत. यंदा चार सदस्यीय प्रभागपद्धती असल्याने एका मतदाराने चार मते टाकायची होती. त्यामुळे एकूण मतांची संख्या चौपट झाली. भाजपापाठोपाठ राष्ट्रवादी काँगे्रसला एकूण ८ लाख ८८ हजार ६५९ इतकी मते मिंळाली. म्हणजेच २८.५३ टक्के मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीचे ३६ नगरसेवक निवडून आले. यासह शिवसेनेला ५ लाख १६ हजार ७२१ म्हणजेच १६ टक्के मते मिळाली. शिवसेनेचे अवघे ९ नगरसेवकनिवडून आले. मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्याही जागा कमी झाल्या. एकूण झालेल्या मतदानापैकी काँगे्रसला अवघे तीन टक्के मतदान झाले. तर नोटाला तब्बल २.८१ टक्के मत देण्यात आली. पाच जागांवर निवडून आलेल्या अपक्षांनी तब्बल आठ टक्के मते घेतली. नोटाला तब्बल ८७ हजार ७७३ जणांनी मत दिले. झालेल्या मतदानात भाजपाने आघाडी घेतली आहे. (प्रतिनिधी)>१२ पक्षांना एकही जागा नाही ही निवडणूक लढविणाऱ्या १८ राजकीय पक्षांपैकी चार राजकीय पक्षवगळता इतर १२ पक्षांना खातेही उघडता आलेले नाही. काँगे्रससह बसपा, एमआयएम, भारिप बहुजन महासंघ, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्युलर), समाजवादी पार्टी, आरपीआय, रासप, भारतीय नवजवान सेना, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया, बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, रिपब्लिकन सेना यांचा समावेश आहे. >अपक्षांनी घेतली २ लाख ६७ हजार मते या महापालिका निवडणुकीत यंदा २३१ अपक्ष उमेदवार होते. यापैकी पाच अपक्ष विजयी झाले. दरम्यान, अपक्षांनी तब्बल २ लाख ६७ हजार २२९ मते घेतली आहेत. अपक्षांनी घेतलेल्या मतांमुळे अनेक दिग्गजांनाही मोठा फटका बसला. राजकीय पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या अधिक होती. >भाजपाला ११ लाख ५३ हजार ६० मतेया निवडणुकीत भाजपाच्या सर्व उमेदवारांना मिळून एकूण ११ लाख ५३ हजार ६० मते मिळाली़ एका प्रभागात प्रत्येक मतदाराला चार मते देण्याचा अधिकार असल्याने मतांची ही संख्या इतकी मोठी आहे़ या निवडणुकीत एकूण सात लाख ७८ हजार मतदारांनी मतांचा हक्क बजावला़ भाजपाच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ८ लाख ८८ हजार ६५९, शिवसेनेला ५ लाख १६ हजार ७२१, तर काँग्रेसला९७ हजार ६३ मते मिळाली़ मनसेला ४२ हजार ९९० आणि बसपला २० हजार ९९५ मते मिळाली आहेत़
भाजपाला मिळाली ३७ टक्के मते
By admin | Published: February 27, 2017 12:07 AM