आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : शेतकरी संघटनेने १ जूनपासून पुकारलेल्या संपाला सोलापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे़ सकाळपासून जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या, आठवडी बाजार, दुध संकलन केंद्रे, भाजी मंडई बंद ठेऊन शेतकरी संपात सहभागी झाले आहेत़ काही ठिकाणी शेतकरी संघटनेने दुध रस्त्यांवर ओतुन सरकारचा निषेध केला आहे़ शेतकरी संघटनेच्या विविध आंदोलनाप्रसंगी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून भाजप सरकारच्या कामगिरीवरून लक्तरे वेशीवर टांगली आहेत़ शेतकऱ्यांचे कर्जमाफ करा, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्या, शेतीपंपाची बिले माफ करा यासह आदी घोषणां देत शेतकऱ्यांनी विविध मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले़ त्यामुळे शहर व जिल्ह्यातील काही ठिकाणचे मार्ग काही काळ बंद झाले होते़ त्यामुळे वाहतुक विस्कळीत झाली होती़ सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संपावर एक नजर- मंगेवाडी ता. सांगोला येथे दूध रस्त्यावर- मोहोळ (सोलापूर ) तालुक्यातील मसले चौधरीत ओतले शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध - मार्केट यार्डात शेतकरी संघटनेची गांधीगिरी फूल देऊन ट्रकचालकांना संपात सहभागी होण्याचे आवाहन- करमाळा तालुक्यात शेतकरी आक्रमक, दूध आणि कांदा रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध,- करमाळयात शेककरी संघटना यांनी संपाचे हत्यार उपसून मार्केट कडे जाणारा भाजीपाला कांदा रोखला असून दूध रस्त्यावर ओतून दिले आहे.- शेतकरी संपाची तीव्रता पाहता भाजीपाला मार्केट बंद करण्यात आला आहे. - बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणवर यांनी आज ५० लीटर दूध डाळीम्बच्या बागेला ठिबक मधून सोडले. - सांगोला डाळिंब मार्केट शेतकरी संपात १००% सामील संपाला संपूर्ण पाठिंबा- दाक्षिण सोलापुर खानापुर, कूसुर , वडापूर येथे दुध सांडुन निषेध, - उपरी गावामध्ये "शेतकरी संप" आंदोलनात सामील होईन गावाने कडकडीत बंद पुकारला- कासेगावजवळील, वडजी गावातील शेतकरीनी फुले टाकुन, आंदोलनाला सुरूवात केली - मोहोळ शेतकऱ्यांचा संपात १०० टक्के सहभाग तर शेतकऱ्यांचा माल विकत घेणाऱ्या आडत व भाजीमंडई येथे कायमस्वरूपी ठिय्या मारून जागा पकडलेल्या व्यापाऱ्यांंनी अगोदरच्या शिल्लक भाजीपाल्याची थाटली दुकाने . चढ्या दराने मालाची विक्री . - करमाळयात शेतकरी संपास खते-बियाणे असो,ने पाठिंबा जाहीर करून आज सर्व दुकाने बंद ठेवली आहेत.- मळोली येथे चार दुध टँन्कर ची हवा सोडून दुध रस्त्यावर सोडून देण्यात आले दोनशे कार्यकर्ते रस्त्यावर - अनवली (ता. पंढरपूर) येथे ही शेतकरी संघटनेचे आंदोलन- वेळापूर मधील सर्व कृषी केंद्रे एक दिवस बंद आहेत शेतकरी संपास पाठींबा दिला आहे - कंदर येथे तरुण मित्र मंडळ दुध रस्त्यावर ओतून शेतकरी संपाला सुरूवात झाली- मोहोळ मध्ये शिवाजी महाराज चौकात दुध ओतून शेतकरी संपास पाठिंबा - पेनूर येथे रस्त्यावर दुध ओतुन शेतकऱ्यांचे आंदोलन- पेनूर येथे सरकारच्या निषेधार्थ गावातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध ओतत आंदोलन केले.- यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामदास चवरे , युवराज माने ,सिताराम डोके ,विठ्ठल बाळासाहेब माने , सुरज चवरे , तानाजी सावंत , भाऊसाहेब धांडे, धुळाप्पा वाघमोडे, ,लखन माने, पिंटू डोंगरे ,शिवाजी धांडे, बापू शेळके ,अवधुत टेकळे, सागर चवरे, आकाश ढेकळे ,रामभाऊ डोके,लहु माने , गणेश राजगुरु,मधुकर डोंगरे , सोमनाथ सावंत , अमोल चवरे , नवनाथ जगताप , धनाजी चवरे ,धनाजी वाघमोडे , दत्ता चवरे , पांडूरंग शिनगारे , बाळासाहेब रणदिवे , दिगंबर कदम , प्रदिप काटकर , हणमंत पुजारी , बालाजी शिंगाडे , राजन माने , शितल जाधव , बिभीषण रणदिवे , दयानंद चवरे ,देवानंद चवरे , आप्पाराव माळी , पांडुरंग माने,तानाजी गवळी,रामभाऊ शिंगाडे , दत्ता माने , विशाल ऐवळे ,बापूराव माने,रामेश्वर धांडे, महादेव माने,केशव माने , संतोष धांडे , आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . मोहोळ येथे शिवाजी चौकात दुध रस्त्यावर टाकत शेतकऱ्यांचा संपात उत्स्फुर्त सहभाग .- अकलुज कृषी उत्पन्न बाजार समितीत ७० टक्के फळे भाजीपाला आवक घटली. तर उद्यापासून अकलुजची दैनंदिन भाजीमंडई बंद ठेवण्याचे शेतक-यांचे भाजी विक्रेत्यांना अवाहन केले असुन उद्यापासुन भाजीमंडई बंद राहणार.
भाजप सरकार शेतकरीविरोधी, सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संपाला १०० टक्के प्रतिसाद, दुधाचे पाट रस्त्यांवर
By admin | Published: June 01, 2017 2:25 PM