लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केवळ अल्पभूधारक नव्हे तर सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णयामुळे भाजपा सरकार सदैव शेतकऱ्यांची बाजू घेत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्चाधिकार समितीचे प्रमुख महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अभिनंदन केले. केंद्र सरकारने आणि भाजपाच्या राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वाधिक मदत शेतकऱ्यांना केली आहे, असेही ते म्हणाले.
भाजपाचे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने - दानवे
By admin | Published: June 12, 2017 2:11 AM