शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

भाजपा सरकार कॉंग्रेसपेक्षाही थापाडे, राज ठाकरे यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 5:36 PM

केवळ भूलथापांच्या बळावर सत्ता भोगणाऱ्या राजकारण्यांनी देशाचे, पर्यायाने महाराष्ट्राचे वाटोळे केले.

 वणी (यवतमाळ) - मी २९ वर्षांपूर्वी राजकारणात आलो. या काळात अनेक सरकारे बदललीत, माणसे बदललीत;  परंतु समस्या मात्र त्याच आहेत. केवळ भूलथापांच्या बळावर सत्ता भोगणाऱ्या राजकारण्यांनी देशाचे, पर्यायाने महाराष्ट्राचे वाटोळे केले. यापूर्वीचे कॉंग्रेस आणि आताचे भाजपा सरकारदेखील थापाडे आहे, असा घणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केला. 

सोमवारी येथे आयोजित मनसे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर, हेमंत गडकरी, संजय चित्रे, अनिल शिदोरे, विठ्ठल लोखंडकर, आनंद एंबडवार, राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, राजेश कदम उपस्थित होते. राज ठाकरे म्हणाले, मी विदर्भाच्या दौºयावर आल्यानंतर सर्वप्रथम अमरावती जिल्ह्यात फिरलो. तेथील सामान्यांच्या समस्या पाहून व्यथीत झालो. आपण केवळ कॉंग्रेसलाच शिव्या घालतो. परंतु भाजपा सरकार त्याहीपेक्षा बनावट आहे. त्यामुळे आधीच्या आणि आताच्या सरकारला बाजुला सारा आणि फक्त एकदा राज ठाकरेच्या हातात सत्ता देऊन बघा, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला. मनसे सैनिकांना जनजागृतीचे आवाहनमोदी म्हणतात, दीड कोटी घरे बांधलीत, ही घरे आम्ही शोधायची कुठे? हे लोक कुठून आकडे आणतात आणि आपल्यापुढे फेकतात आणि आपणही या आकड्यांना भुलतो, असे राज ठाकरे म्हणाले. सर्वच राजकीय पक्ष खोटारडे आहेत. मात्र माध्यमातून हा खोटारडेपणा लिहला जात नाही वा दाखवला जात नाही, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली. आता केवळ घोषणा देऊन चालणार नाही, तर प्रत्येक मनसे सैनिकांनी घरोघरी जाऊन ही वस्तुस्थिती लोकांना सांगितली पाहिजे. लोकांना जागृत केले पाहिजे, असे ते म्हणाले. पुन्हा वणीत येणारआज राजकीय भाषण करण्याची वेळ नाही, अनेक मुद्यांवर बोलायचे आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात वणीत येणार आहे, त्यावेळी सविस्तर मी आपल्याशी बोलेन, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी प्रास्ताविक केले. या कार्यकर्ता मेळाव्याला वणी मतदार संघातील पाच हजारांवर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी राज ठाकरे यांचे स्थानिक टिळक चौकात मनसेच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. तेथून ठाकरे मेळावास्थळी रवाना झालेत. राज ठाकरे यांचे व्यासपिठावर आगमन होताच राजू उंबरकर व पदाधिकाºयांनी २१ फुटाच्या भल्यामोठ्या हाराने राज ठाकरे यांचे स्वागत केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण