शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
3
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
5
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
7
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
8
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
9
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
10
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
11
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
12
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
13
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
14
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
15
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
16
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
17
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
18
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
19
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
20
सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

भाजपाने माढ्यातून लढण्याची मला दिली होती ऑफर : महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 7:58 PM

आमची ताकद वाढल्यानेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुलीच्या प्रचारासाठी आता घोंगडी बैठका देखील घ्याव्या लागत आहेत,

ठळक मुद्देपुढील पाचवर्ष महायुतीबरोबच राहणार मोठा भाऊ म्हणून भाजपने माझे काहीप्रमाणात केले नुकसान  बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी चांगले वातावरण

बारामती : बारामतीची जागा मिळवण्यात माझी ताकद कमी पडली. मोठे पक्ष लहान पक्षाला दाबतात. भाजपने मला त्यांच्या चिन्हावर निवडणुक लढवण्याची ऑफर दिली होती. मात्र मी त्याला नकार दिला. त्यानंतर अगदी दोन दिवसांपूर्वी देखील भाजपाने माढ्यातून माझ्याच पक्ष चिन्हावर निवडणुक लढवण्याची विनंती केली होती, मात्र आता वेळ गेली आहे असे सांगून मी निवडणुक लढणार नसल्याचे सांगितले, असा गौप्यस्फोट दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला. बारामती येथे कार्यकर्ता बैठकीनंतर जानकर माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आमच्यामध्ये वादावादी झाली तरी मी पुढील पाचवर्ष महायुतीबरोबच राहणार आहे. भाजपने जरी रासप आमदार राहूल कुल यांच्या पत्नीला बारामतीमधून उमेदवारी दिली तरी राहूल कुल रासप सोडणार नाहीत. आमचे यावेळी नुकसान झाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे. मात्र कार्यकर्त्यांना समजाविण्यासाठीच मी आता फिरत आहे. खासकरून बारामती व माढा मतदारसंघामध्ये माझ्यापक्षाची ताकद लावणार आहे. तेथील महायुतीच्या उमेदवारासाठी रासप काम करणार आहे, असे यावेळी जानकर यांनी सांगितले. यावेळी जानकर यांनी आपली  उद्विग्नता  बोलून दाखवली. ते म्हणाले, ‘मोठा भाऊ म्हणून भाजपने माझे काहीप्रमाणात नुकसान केले आहे. मात्र मी देखील त्यांना माझ्याशिवाय तुम्हाला राज्यात यश मिळणार नसल्याचे  सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत देखील मी तुमचा कार्यकर्ता नसून मित्र आहे. मित्रासारखी मला वागणूक द्या असे सांगितले होते. 

 बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी चांगले वातावरण आहे. आमची ताकद वाढल्यानेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुलीच्या प्रचारासाठी आता घोंगडी बैठका देखील घ्याव्या लागत आहेत, असा टोला जानकर यांनी लगावला. 

टॅग्स :BaramatiबारामतीMahadev Jankarमहादेव जानकरBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवार