यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांची भाजपच्या मंत्र्यांकडील कामे तातडीने व्हावीत, यासाठी आता प्रत्येक मंत्र्यांकडे समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समन्वयकांची पहिली बैठक बुधवारी भाजपच्या प्रदेश कार्यालयात झाली.
पक्ष आणि सरकार यांना जोडणारा दुवा म्हणून हे समन्वयक म्हणून काम करतील. कुठलाही कार्यकर्ता, नेता मंत्रालयात आल्यानंतर त्याचे काम समजून घेऊन ते मार्गी लावतील. भाजपचे राज्यस्तरीय पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांशी समन्वय राखून सरकारमधील त्यांची कामे थांबणार नाहीत, याची काळजी घेतील.
राज्य वीज मंडळाच्या होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी या समन्वयकांची बैठक घेतली.
मंत्री -- समन्वयक
- देवेंद्र फडणवीस -- संजय पाटणकर
- राधाकृष्ण विखे -- हरिश कुलकर्णी
- सुधीर मुनगंटीवार -- अमोल जाधव
- चंद्रकांत पाटील -- सुनील लोढा
- विजयकुमार गावित -- रवी दांडगे
- गिरीश महाजन -- संदीप म्हात्रे
- सुरेश खाडे -- प्रमोद फडणीस -- वैभव नलावडे
- रवींद्र चव्हाण -- सौरभ ताम्हणकर
- अतुल सावे -- अशोक शेळके
- मंगलप्रभात लोढा -- रोहित सावंत
शिंदे गटातील मंत्र्यांकडे मात्र समन्वयक नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे दहा मंत्री आहेत. मात्र, या मंत्र्यांकडे कुणालाही अद्याप समन्वयक म्हणून नेमलेले नाही.