मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपाच्या सत्तास्थापनेच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. इतर पक्षांपेक्षा जवळपास दुप्पट जागा जिंकूनही भाजपाला सत्तास्थापनेसाठी शिवसेनेवर अवलंबून राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत भाजपाच्या नवनियुक्त आमदारांची बैठक ३० ऑक्टोबर रोजी होईल. या बैठकीला भाजपाचे सर्व १०५ आमदार उपस्थित राहणार असून, यावेळी विधिमंळ नेत्याची निवड आणि भावी वाटचालीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.भाजपाच्या नवनियुक्त आमदारांची बैठक ३० ऑक्टोबर रोजी विधान भवनात होणार आहे. यावेळी पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड होईल. भाजपाचे सर्व १०५ आमदार या बैठकीस उपस्थित राहतील, अशी माहिती भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
३० ऑक्टोबरला भाजपाच्या आमदारांची बैठक, सत्त्तास्थापनेबाबत मंथन होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 17:00 IST