शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

"जनतेच्या मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा ऐरणीवर", काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 7:56 PM

Nana Patole Criticize BJP: जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे, त्यावर भाजपा उत्तर देऊ शकत नाही म्हणूनच जनतेच्या मुळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा पुढे करण्यात आलेला आहे

मुंबई -  भारतीय जनता पक्षाकडे देशातील जनतेला भेडसावत असलेल्या ज्वलंत समस्यांवर कोणतेही उत्तर नाही. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी झालेले आहे. जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे, त्यावर भाजपा उत्तर देऊ शकत नाही म्हणूनच जनतेच्या मुळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा पुढे करण्यात आलेला आहे, असा आरोप काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, मागील ९ वर्षांपासून केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आहे परंतु या सरकारने जनतेच्या हिताचे एकही काम केलेले नाही. अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडलेला आहे, महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे, जगणे कठीण झाले आहे, बेरोजगारीने तरुणवर्ग त्रस्त आहे, नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवकांचे भविष्य अंधःकारमय झाले आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीसाठी लागणारे साहित्य, खत, बि-बियाणे महाग झाले आहे. कोणत्याच घटकाचा विकास मोदी सरकार करु शकले नाही. या मुळ प्रश्नांवर भाजपाकडे सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून जाणीवपूर्वक सावरकरांचा मुद्दा पुढे करुन मुळ मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे. 

राहुल गांधी हे सातत्याने नरेंद्र मोदी यांना जनतेच्या प्रश्नांवर जाब विचारत असतात. राहुल गांधी हे देशातील एकमेव नेते आहेत, जे मोदी सरकारच्या कारवायांना न डगमगता ताठ मानेने तोंड देत आहेत. भाजपाने राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी सर्व प्रयत्न करुन पाहिले पण त्यात त्यांना यश आले नाही. आताही खासदारकी रद्द केली, सरकारी घर खाली करण्यास सांगितले, त्याआधी ईडी चौकशी मागे लावली पण राहुल गांधी मागे हटले नाहीत. देशात आज लोकशाही व्यवस्था, संविधान धोक्यात आलेले आहे, सर्व यंत्रणा सरकारच्या कठपुतली बाहुल्या झाल्या आहेत, याविरोधात लढा देण्याची गरज असून राहुल गांधी व काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधान वाचवण्यासठी लढत आहेत आणि ही लढाई आम्ही लढत राहु, असेही नाना पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर