भाजपाच्या आयटी सेलची वेबसाईट हॅक? खासगीपणावरून दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 08:56 PM2018-12-22T20:56:04+5:302018-12-22T21:08:09+5:30
सोशल मिडीयाचा वापर करून काँग्रेससह विरोधकांना पळता भुई थोडी करणाऱ्या भाजपच्या आयटी सेलवर त्यांची वेबसाईट दुरुस्तीसाठी बंद करण्याची वेळ आली आहे.
नाशिक/मुंबई : देशाच्या नागरिकांच्या मोबाईल, कॉम्प्युटरच्या तपासणीसाठी 10 यंत्रणांना परवानगी दिल्याने देशभरातून टीका होत आहे. यामुळे काही हॅकरनी भाजपाची आयटी सेलची वेबसाईटच हॅक केल्याने खळबळ उडाली आहे.
सोशल मिडीयाचा वापर करून काँग्रेससह विरोधकांना पळता भुई थोडी करणाऱ्या भाजपच्या आयटी सेलवर त्यांची वेबसाईट दुरुस्तीसाठी बंद करण्याची वेळ आली आहे.
हॅकरनी या वेबसाईटच्या होमपेजवर काळ्या बॅकग्राऊंडमध्ये आम्हाला खासगीपणा हवा आहे. खासगीपणा हा आमचा हक्क आहे. आम्ही भाजपाचा खरा चेहरा उघड करू. आमच्याकडे भाजपाच्या काळ्या पैशांबाबतचे पुरावे आहेत. नियम बदला किंवा देश सोडा. लवकरच पुरावे न्यायालयासमोर येतील असा इशारा दिला आहे.
हॅक केल्याने वेबसाईटचे होम पेजवर मॅसेज दाखवण्यात आला होता. यामुळे आयटी सेलने तातडीने वेबसाईट दुरुस्तीचे काम हाती घेतले असून तसा संदेशही वेबसाईटवर दिसत आहे.करण्याचा धोका संभवणे शक्य असल्याने भाजपाच्या आयटीसेलेने वेबसाईट दुरुस्त करण्यासाठी काम सुरू केले आहे. तसा संदेशही या बेबसाईटवर दिसत आहे.
False alarm! BJP IT cell has no website of its own. Our official website is just fine... pic.twitter.com/KTtdgceNsu
— Amit Malviya (@amitmalviya) December 22, 2018
यावर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवया यांनी खुलासा करताना हा खोडसाळपणा असून, भाजपाच्या आयटी सेलची अशी कोणतीही स्वतंत्र वेबसाईट नाही. भाजपाच्या सर्व वेबसाईट सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
यावर एका ट्विटरकर्त्याने नागपूरच्या आयटी सेलचे अध्यक्ष केतन मोहितकर यांच्या प्रोफाईलचा स्क्रीनशॉट काढून मालवय्या यांना खोटे बोलू नका असे सांगितले आहे. केतन मोहितकर यांच्या ट्विटरवरील प्रोफाईलवर भाजपाच्या आयटी सेलचा उल्लेख असून आयटी सेलची वेबसाईट www.bjpitcell.org हा अॅड्रेसही नोंद आहे.
Simply you don't see means that it didn't happen.
— 𝔼𝕧𝕚𝕝 ℙ𝕒𝕪𝕝𝕠𝕒𝕕 (@aksh_cs) December 22, 2018
Look at the bio of https://t.co/pPRvokrj6S
President, BJP IT & Social Media Cell
What website do you see?#Peacepic.twitter.com/ftCiYPKwqP