शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत सारे आलबेल? मातोश्रीवरची बैठक सोडून आदित्य ठाकरे, अनिल परब शरद पवारांच्या भेटीला 
2
उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक; राऊत म्हणाले, 'विषय गंभीर'
3
“आरक्षण कसे देत नाही ते बघूच, सरकारची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही”; मनोज जरांगे आक्रमक
4
IND vs NZ : ३६ वर्षांचा दुष्काळ संपला! टीम इंडियाला न्यूझीलंडनं पाजलं पराभवाचं पाणी
5
Raigad: हरिहरेश्वर येथे रूम देण्यास नकार देणाऱ्या हॉटेल मालकाच्या बहिणीस मद्यधुंद पर्यटकांनी चिरडले
6
IND vs NZ : भारताचा दारुण पराभव! तीन दशकांनंतर न्यूझीलंडचा विजय; टीम इंडिया कुठे चुकली?
7
Lawrence Bishnoi : "जेलमध्ये दरवर्षी ४० लाख खर्च, महागडे कपडे-बूट घालतो लॉरेन्स बिश्नोई"; भावाचा मोठा दावा
8
“लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक फसवायचे काम करतायत, पण...”; अजितदादा गटातील नेते थेट बोलले
9
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचं अमित शाहांच कारस्थान, संजय राऊत यांचा सनसनाटी आरोप
10
रस्त्याच्या कडेला मजुरांच्या बाजूला झोपला अभिनेता; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'व्हिडिओसाठी...'
11
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या फोनमध्ये झिशान यांचा फोटो, स्नॅपचॅटवर केलं प्लॅनिंग
12
सुप्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपच्या आईचं निधन, ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम धर्मगुरूंची भेट, २ तास चर्चा; २ दिवसांत निर्णय? चर्चांना उधाण
14
मनोज जरांगेंनी सुद्धा निवडणूक आजमवायला हरकत नाही; छगन भुजबळांनी दिला हा तर्क
15
“तुला लंकेंनी पाठवले का?”; भरसभेत अजित पवार संतापले; कार्यकर्त्याला चांगलेच सुनावले
16
मोठा उलटफेर! IPL 2025 जिओ सिनेमावर दिसणार नाही? डिस्ने हॉटस्टार पुन्हा प्रक्षेपण करण्याची शक्यता
17
बिग बॉसनंतर कोणी 'बच्चा' भेटलंय का? सूरज लाजत म्हणाला- "लय पोरींचे मॅसेज येतात पण..."
18
अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे लीक; इस्रायल कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याची शक्यता
19
लाहोरची वधू, जौनपूरचा वर, भाजपा नेत्याच्या मुलाचा पाकिस्तानमधील तरुणीशी ऑनलाईन निकाह
20
धक्कादायक खुलासा! वृक्ष, जमीन, समुद्राने कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणे थांबविले; कोणत्या संकटाची चाहूल...

केव ग्रामपंचायत भाजपाच्या हाती

By admin | Published: July 23, 2016 3:14 AM

केव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाच्या प्रेमा राऊत यांची तर उपसरपंचपदी शर्मिला नाईक यांची निवड झाली आहे.

विक्रमगड : महिला सरपंच आरक्षणानुसार सरपंचपदाच्या घेण्यात आलेल्या निवडणुकीत तालुक्यातील केव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाच्या प्रेमा राऊत यांची तर उपसरपंचपदी शर्मिला नाईक यांची निवड झाली आहे. त्यामुळे ४० वर्षापासून दुसऱ्या पक्षांची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीवर भाजपाने आपला झेंडा रोवला आहे.तालुक्यात सध्यस्थितीत ३७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या निवडणुकांचे वातावरण सर्वत्र सुरु असून ज्या ग्रामपंचायतीच्या मुदती जुलैमध्ये संपत आहेत, त्या अनुषंगाने विक्रमगड तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये १३ ग्रामपंचायतीवर भाजपाने आपली बाजी मारली आहे.केव ग्रामपंचायतीवर ४० वर्षापासून दुसऱ्या पक्षांची सत्ता असलेल्या हा विजय भाजपासाठी मोठा आहे. या दरम्यान भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजय औसरकर यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा व खासदार चिंंतामण वनगा तसेच जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर गुरुवार विक्रमगड तालुक्यांत भाजपाने भरघोस यश संपादन केले आहे. विक्रमगड तालुक्यात १३ ग्रामपंचायतींवर फक्त भाजपाने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. अजून अनेक ग्रामपंचायती सरपंच निवड बाकी आहे. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पावडे, उपसभापती मधुकर खुताडे, महेश आळशी, सुशील औसरकर, सुधाकर पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)>खोडाळा ग्रामपंचायत शिवसेनेकडेचमोखाडा : तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आसे व खोडाळा ग्रामपंचायतीत सेनेने एकहाती सत्ता काबीज केली आहे. आसे ग्रामपंचायतीत सरपंचपदी रुखमनी कोरडे, उपसरपंचपदी प्रकाश वाजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खोडाळा ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी प्रभाकर पाटील आणि उपसरपंचपदी चंद्रमानी मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.>राजकीय रस्सीखेच शिगेलाराज्यात आणि केंद्रात जरी भाजप आघाडीचे राज्य असले तरी ग्रामपंचाय सरपंच उपसरपच निवडणूकीमध्ये आपले कार्ड चालविणे भाजपाला तेवढे सोपे जात नाही.जिल्ह्यामध्ये शहरी भागात शिवसेनेच काम चांगले असतांना तर ग्रामिण भागामध्ये माकप व श्रमजीवी संघटना रुजलेली असतांना राजकीय रस्सीखेच शिगेला पोहचली आहे.>आबिटघर ग्रामपंचायत सेना-माकपकडेवाडा : तालुक्यातील आबिटघर या ग्रामपंचायतीवर शिवसेना-माकपने आपले वर्चस्व सिद्ध केले असून सरपंचपदी मारूती मोरघा यांची तर उपसरपंचपदी दयानंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात येऊन सत्ता स्थापन केली आहे. सदस्यपदी हर्षला पाटील, आरती पाटील, प्रकाश धनगरे, विनायक वेहळे हे निवडून आले आहेत. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. कुयलू ग्रामपंचायतीवर श्रमजीवी संघटनेने आपला झेंडा फडकवला असून सरपंचपदी योगिनी कुसल व उपसरपंचपदी राजेश सवर यांची निवड झाली आहे . या ग्रामपंचायतीवर गेली २५ वर्षे कुणबी सेनेची सत्ता होती. तर बिलावली खरीवली या ग्रामपंचायतीवर भाजपाने सत्ता स्थापन केली असून सरपंचपदी रंजिता जाधव यांची तर उपसरपंचपदी महेश जाधव यांची निवड करण्यात आली आहे.