शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

“आता राज्यातील सर्व गुन्ह्यांची उकल ‘एनआयए’ने करावी काय?”; भाजपचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 3:33 PM

युरेनियम साठा प्रकरणी ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली.

ठळक मुद्देयुरेनियम साठा प्रकरणी ठाकरे सरकारवर टीकाराज्यातील सर्व गुन्ह्यांची उकल ‘एनआयए’ने करावी काय?भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ट्विट करत विचारणा

मुंबई: अणुबॉम्बसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत ज्वलनशील अशा युरेनियमचा मोठा साठा अलीकडेच मुंबईत जप्त करण्यात आला होता. याप्रकरणात दोन जणांना दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती. मात्र, यानंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA कडे देण्यात आला आहे. यावरून आता ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा टीका करण्यात आली असून, राज्यातील सर्व गुन्ह्यांची उकल ‘एनआयए’ने करावी काय, अशी विचारणा करण्यात आली आहे. (bjp keshav upadhye asked that should nia solves all crime in the state) 

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट करून या प्रकरणी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारच्या थंड कारभाराचा आणखी एक नमुना. मुंबईत सापडलेल्या युरेनियम प्रकरणात तब्बल तीन महिन्यांचा वेळकाढूपणा झाल्यानंतर अखेर तपास एनआयएने ताब्यात घेतला. राज्यातील साऱ्या गुन्ह्यांची उकल एनआयएने करावी काय.. राज्य सरकारच्या तपास यंत्रणांवर कोणाचे दडपण आहे?, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे. 

“मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती”

NIA कडून आरोपींविरुद्ध गुन्हा 

राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणातील दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. जिगर पांड्या आणि अबू ताहीर अशी  आरोपींची नावे आहेत. या दोघांनी ७ किलो १०० ग्रॅम युरेनियमचा साठा मानखुर्दमधल्या एका कारखान्यात लपवून ठेवला होता. हे दोघेही गेल्या वर्षभरापासून हा साठा विकण्यासाठी गुप्तपणे ग्राहक शोधत होते, अशी माहिती मिळाली आहे. या आरोपींना १२ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत.

‘मुंबई मॉडेल’ प्रेरणादायी; नीती आयोगाकडूनही दखल, महापालिकेचे केले कौतुक

दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही आरोपी उच्चशिक्षित असून, ते एमबीए पदवीधारक आहेत. जिगर हा एका खासगी आयटी कंपनीत काम करतो, तर ताहीर हा आयात-निर्यात व्यावसायिक आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले युरेनियम ९० टक्के नैसर्गिक आणि शुद्ध असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत २१ कोटींहूनही अधिक असेल, असे म्हटले जात आहे. किरणोत्सारी गुणधर्म आणि आरोग्यास घातक असल्याने शासनाने युरेनियमला प्रतिबंधित पदार्थ म्हणून जाहीर करण्यात आले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारBJPभाजपाPoliticsराजकारण