शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

"सर्वस्व गेलेल्या, निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका उद्विग्न..."; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 10:14 AM

BJP Keshav Upadhye slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा पार पडली. यावेळी ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरुन टीकास्त्र सोडलं. "एकीकडे राज्यात दुष्काळ पडलाय आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जपानमध्ये आहेत. फडणवीस यांना मी बोलणं सोडलं आहे."

"मागे मी त्यांना कलंक बोललो होतो, त्यांना फडतूस बोललो, तर बोबाटा झाला होता. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही. अरे टरबूजालाही पाणी द्यावं लागतं" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली. य़ा टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "सर्वस्व गेलेल्या आणि निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका उद्विग्न नेत्याचे हे उदगार आहेत" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. तसेच "उद्धवजी, आपले सर्वस्व संपले आहे, हे आपणच मान्य करून टाकलं, हे बरं झालं" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"एखाद्या मानसोपचारतज्ञाची मदत घ्यावी लागेल" 

भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "सर्वस्व गेलेल्या आणि निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका उद्विग्न नेत्याचे हे उदगार आहेत! उद्धवजी, आपले सर्वस्व संपले आहे, हे आपणच मान्य करून टाकलं, हे एक बरं झालं! मतदार विचारत नाहीत, साथीदार साथ देत नाहीत अशा अवस्थेत तुमचा तोल ढळला आहे. एखाद्या मानसोपचारतज्ञाची तुम्हाला मदत घ्यावी लागेल असे वाटते. बघा तुमच्याकडे कोणी मिळते का?" असं केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"भाजपमध्ये तुम्हाला नेते घडवता येत नाही का?"

उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला. "शिवसेना फोडल्यानंतर डबल इंजिन सरकारमध्ये आणखी एक डबा अजित पवार यांचा जुळला आहे. अजून किती डबे लागणार आहेत, जणू काय मालगाडी आहे का? डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, चौपल इंजिन. तुमच्या पक्षामध्ये चांगले नेते तयार करायचे काही कतृत्व नाही. भाजपमध्ये तुम्हाला नेते घडवता येत नाही का? तुमच्या पक्षात नेते नाहीत का? तुम्हाला नेते माझे लागतात, वडील माझे लागतात. त्या दिल्लीच्या वडिलांची काय हिंमत राहिली नाही का? हे नामार्द आहेत. त्यांना स्वत:चे काही विचार नाही. भाजप फक्त कार्यकर्त्यांना वापरून घेते. इतर पक्षांचे नेते चोरणारे आम्ही हिंदू आहोत आमची ताकद पाहा, कसली डोंबल्याची ताकद, याला नामर्द म्हणतात" अशी टीकाही ठाकरेंनी केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण