मुंबई :सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंगांच्या लेटरबॉम्बनंतर (Param Bir Singh Letter) गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांची निवड करण्यात आली. राजकीय निष्ठा बाळगून काम करणाऱ्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांची माहिती घेणार असल्याचे दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) यांनी म्हटले होते. यावरून पोलीस खात्यात आणखी किती 'वाझे' आहेत याचा शोध घ्या, असा टोला भाजपने लगावला आहे. (keshav upadhye taunts dilip walse patil)
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीका केली. दिलीप वळसे-पाटील यांनी गृहखात्याच्या कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांना राजकीय निष्ठा बाळगून असलेल्या अधिकाऱ्यांबद्दल विचारण्यात आले. पोलीस दलातील काही अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित असल्याची चर्चा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर, 'कुणाची निष्ठा काय आहे हे लवकरच तपासून पाहिलं जाईल,' असे त्यांनी स्पष्ट केले. यावर, संघनिष्ठ अधिकारी शोधण्यापेक्षा पोलीस खात्यात आणखी किती वाझे आहेत याचा शोध घ्यावा, असा सल्ला केशव उपाध्ये यांनी दिला आहे.
“केंद्रातील मोदी सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे”
ते राज्यासाठी अधिक फायद्याचे असेल
नवनियुक्त गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस खात्यात संघनिष्ठ अधिकारी कोण आहेत, याची तपासणी करू असं वक्तव्य केलं. आम्ही गृहमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितो की, संघनिष्ठ अधिकारी शोधण्यापेक्षा पोलीस खात्यात आणखी किती वाझे आहेत याचा शोध घ्यावा. ते राज्यासाठी अधिक फायद्याचे असेल, असे केशव उपाध्ये म्हणाले.
कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं
कोरोना प्रादुर्भावाचा अटकाव करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या नावाखाली राज्य सरकारने लॉकडाऊन लावत जनतेची घोर फसवणूक केली आहे. रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्पर विरोधी विधाने पाहता राज्य सरकारची परिस्थिती “कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं”, अशी झाली आहे, असा टोला केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला लगावला.
तृप्ती सावंत यांनी शिवसेना आणि बाळासाहेबांचा अवमान केला; माजी महापौरांची टीका
दरम्यान, राज्यावरील हे संकट टळण्यासाठी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सरकारला साथ देण्यास भाजप तयार आहे. मात्र, सरकारने सामान्य, गोरगरीब, कष्टकरी वर्गाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने या वर्गाला आर्थिक मदत द्यावी, असे भाजपने सुचवले होते. रविवारी आपला निर्णय जाहीर करून मुख्यमंत्री ‘मातोश्री’त बसले आहेत. या संकट काळात जनतेचे काय हा साधा प्रश्नही त्यांना पडत नसावा काय? सरकार एवढे निर्दयी कसे असू शकते?, असा घणाघात भाजपने सरकारवर केला आहे.