मुंबई: गेल्या काही काळापासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या ५ कंपन्यांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. मुंबईहून वाशिमला पोहोचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या संस्थांवर धाडी टाकल्या. या कारवाईचे भाजपने स्वागत केले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडत, ठाकरे सरकारची महान इलेव्हन अशी यादीच दिली आहे. (bjp kirit somaiya criticised cm uddhav thackeray govt and shivsena over ed raids on bhavana gawali)
“आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करत ठाकरे सरकारची महान इलेव्हन असे लिहीत खाली ११ जणांची नावे लिहिली आहेत. यामध्ये प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, यशवंत जाधव, यामिनी जाधव, मिलिंद नार्वेकर यांची नावे लिहिण्यात आली आहेत. यानंतर ईडीने केलेल्या कारवाईचे स्वागत करत किरीट सोमय्या यांनी समाधान व्यक्त केले आहे.
“योग्य वेळ आली की सीडी लावणार”; एकनाथ खडसेंनी दिला थेट इशारा
शिवसेनेची टीम लूटमार करतेय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची टीम लूटमार करतेय, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. भावना गवळीच्या टीमने १०० कोटींची लूट नाही, तर माफियागिरी चालवली आहे. १८ कोटी रुपये रोख भावना गवळी यांनी विविध संस्थांमधून काढले आहेत आणि ७ कोटींची चोरी झाल्याचे असे प्रकार आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फक्त एवढेच काम करत आहे. भावना गवळींच्या विविध संस्थांची चौकशी सुरु आहे. ईडीच्या या कारवाईचे स्वागत करत आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
दरम्यान, यापूर्वी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी वाशिम पोलिस ठाण्यात कार्यालयातून ७ कोटी रुपयांची रक्कम पहाटे ५ वाजता चोरीला गेल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवालाची नोंद केली. खासदार भावना गवळी यांचा कार्यालयातून पहाटे ५ वाजता ₹ ७ कोटी रोख नगदी चोरी? शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत ७/७/२०१९ रोजी सकाळी ५ वाजता ₹ ७ कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार १२/५/२०२० रोजी वाशीम पोलीस ठाण्यात केली. एवढी रोख रक्कम आली कुठून?, असा मार्मिक सवाल ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.