शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

Kirit Somaiya : "ठाकरे सरकारचे माफिया पोलीस आयुक्त, हिसाब तो लेकर रहेंगे"; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 11:51 AM

BJP Kirit Somaiya And Uddhav Thackeray : भाजपाने उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच संजय पांडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना नोटीस बजावली आहे. पांडे यांना मंगळवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. पांडे हे दोन दिवसांपूर्वीच निवृत्त झाले असताना त्यांना ईडी चौकशीला तोंड द्यावे लागेल. पांडे यांनी २००१ मध्ये एक आयटी ऑडिट कंपनी सुरू केली होती. त्यादरम्यान पांडे यांनी दिलेला राजीनामा न स्वीकारल्याने ते पुन्हा पोलीस दलात रुजू झाले. संबंधित  कंपनीत मुलगा आणि आईला त्यांनी संचालकपदी नेमले. २०१० आणि २०१५  च्या दरम्यान पांडे यांच्या या कंपनीला एनएसई सर्व्हर आणि सिस्टम्सचे आयटी ऑडिट कॉन्ट्रॅक्ट दिले. 

सीबीआयने नॅशनल स्टॉक एक्स्चेंज घोटाळ्यात २०१८ मध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या गुन्ह्याच्या आधारे ईडीदेखील याप्रकरणी चौकशी करत आहे. यावरून आता भाजपाने उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच संजय पांडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारचे माफिया पोलीस आयुक्त असं म्हटल आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "ठाकरे सरकारचे माफिया पोलीस आयुक्त, संजय पांडे यांना ईडीने बोलावलं आहे. हिसाब तो लेकर रहेंगे " असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

संजय पांडे यांच्या या फर्मला २०१० ते २०१५ च्या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) सर्व्हर आणि सिस्टम्सचे आयटी ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. याच काळात एनएसईमध्ये को-लोकेशन घोटाळा झाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. एनएसई को-लोकेशन घोटाळ्यात निवडक ब्रोकरना फायदा करून देण्यात आला होता. सुरुवातीला सीबीआयने एनएसई घोटाळ्यात २०१८ मध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. 

सीबीआयने याप्रकरणी गेल्या चार वर्षांच्या कालावधीत केलेल्या तपासाच्या आधारे एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण आणि माजी ग्रूप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यन यांना अटक केली आहे, तर पांडे यांच्या फर्ममधील एकाची चौकशी केल्याची माहिती मिळते. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेIPS Sanjay Pandeyसंजय पांडेBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय