Maharashtra Politics: “सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करताना अजितदादांनी काकांना विचारले का?”; भाजपचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 11:16 AM2023-04-03T11:16:50+5:302023-04-03T11:17:54+5:30

Maharashtra Politics: १५ वर्षे मंत्री, मुख्यमंत्री असलेले काका आणि त्यांच्यासोबत असलेल्या आकांना प्रश्न का विचारला नाही, याचे उत्तर अजित पवारांनी द्यावे, असे भाजपने म्हटले आहे.

bjp leader ashish shelar replied ncp ajit pawar over to give veer savarkar bharat ratna criticism | Maharashtra Politics: “सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करताना अजितदादांनी काकांना विचारले का?”; भाजपचा सवाल

Maharashtra Politics: “सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करताना अजितदादांनी काकांना विचारले का?”; भाजपचा सवाल

googlenewsNext

Maharashtra Politics: महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप, केंद्रातील मोदी सरकार आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अनेकविध मुद्द्यांवरून भाजपवर सडकून टीका केली. यातच सावरकरांना भारतरत्न द्या, तुमच्यात हिंमत आहे का? अशी विचारणाही अजित पवार यांनी केली. अजित पवारांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य केल्याने देशभरात गदारोळ सुरु आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा निषेध म्हणून शिंदे गट आणि भाजपने ‘सावरकर गौरव यात्रा’ काढली. या यात्रेचा  आयोजित केली आहे. या यात्रेवरून विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाल्यावर दातखीळ बसली होती का? अशी विचारणा अजित पवार यांनी केली. तुमच्यात धमक आणि ताकद असेल, तर केंद्रात तुमच्या विचारांचे सरकार आहे. राज्यात तुम्ही लोक बसत आहात. सावरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आणि अभिमान आहे. तुम्हालाही अभिमान असेल, तर ताबडतोब सावरकरांना भारतरत्न द्या. तुमच्यात हिंमत आहे का? असे आव्हान अजित पवार यांनी दिले. 

सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करताना अजितदादांनी काकांना विचारले का?

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. हे अजित पवारांनी काकांना का विचारले नाही? स्वत:चे काका १५ वर्षे मंत्री आणि मुख्यमंत्री होते. काका नाहीतर ज्यांच्याबरोबर राहिले ते आका सुद्धा होते. काका आणि आकांना प्रश्न का विचारला नाही, याचे उत्तर अजित पवारांनी द्यावे. मग आम्हाला प्रश्न विचारावा, असा पलटवार आशिष शेलार यांनी केला. 

दरम्यान, तत्कालीन राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला. सरकारमधील मंत्री, प्रवक्ते आणि आमदारांनीही बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान करण्याचे काम केले. तेव्हा दातखीळ बसली होती का, त्यावेळी का गौरव यात्रा काढण्यात आल्या नाहीत, असा सवाल करत अजित पवारांनी भाजपवर वज्रमूठ सभेत घणाघात केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: bjp leader ashish shelar replied ncp ajit pawar over to give veer savarkar bharat ratna criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.