"नवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्लीपोलिसांनी अटक केली आहे. यात महाराष्ट्रातून जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात अशी कट कारस्थान सुरु असताना महाराष्ट्र राज्याच दहशातवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलय का?," असा सवाल भाजप नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला आहे. पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावामुळे त्यांच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतय असा आरोप ही त्यांनी यावेळी केला.
नॅान कॅाग्निजेबल ॲाफेन्समधे केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे राज्याचे पोलीस, पत्रकारांना हात नाही पाय लावू अशी भाषा करणारे पोलीस, विद्यमान आमदाराला लूक आउट नोटीस काढण्याचा प्रताप करणारे पोलीस दहशतवाद्यांच्या बाबतीत का झोपले होते हे गृहमंत्री स्पष्ट करतील का? या दहशतवादी प्रकरणाची इंटेलिजन्स माहिती पोलिसांना, गृहमंत्र्यांनी होती तर मग एका विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका असं राजकीय प्रकरण नाही ना ? असा सवाल करत पोलिसांच्या इंटेलिजन्स फेल्युअरवर गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शेलार यांनी केली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.
आता सरकार बैठका घेतल असलं तरी झालेल्या अक्षम्य दुर्लक्षावर आता पांघरुण घालता येणार नाही. राजकर्ते पोलिसांच लक्ष नको त्या विषयात घालतात मग अशा घटना घडतात. आमचे पोलीस सक्षम आहेत पण राजकीय दबाव, सरकारची गटबाजी, वसुलेबाजी आणि सौदेबाजी यामुळे ही स्थिती आली असंही ते म्हणाले. चौकशी अजून वाढवावी आणि गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आवाहन ॲड शेलार यांनी केल आहे.
दहशतवादी हल्ल्याचा कट उधळलादिल्लीत आणि देशाच्या काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक अतिरेक्यांच्या कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी ज्या सहा अतिरेक्यांना अटक केली आहे, त्यापैकी दोघांना पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आले होते. या सहा जणांकडून स्फोटके व शस्त्रस्त्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान व उत्तर प्रदेशात काही ठिकाणांची रेकीही त्यांनी केली होती.
पोलिसांनी आधी ज्या दोघांना दिल्लीतून तर समीर नावाच्या इसमाला उत्तर प्रदेशातील कोटामधून आणि तिघांना राजस्थान येथून ताब्यात घेण्यात आले. या सहापैकी एक जण महाराष्ट्रातील असल्याचे समजते. सणासुदीच्या काळात आणि निवडणुकांचा प्रचार सुरू झाल्यावर काहींच्या हत्या व विशिष्ट ठिकाणी स्फोट करण्याचा यांचा कट होता, असे पोलिसांनी सांगितले.
१५ दिवसांचे प्रशिक्षणझीशान आणि ओसामा या दोघांना मस्कतमार्गे पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. तिथे त्यांना स्फोट घडवणे आणि शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. एके ४७ रायफल कशी चालवावी, हेही शिकविले होते. हे प्रशिक्षण १५ दिवसांचे होते.
अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे उघडया सहा जणांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही पोलीस तपासात आढळले आहे. त्यांची अंडरवर्ल्डमधील काहींशी ओळख करून देण्यात आली होती आणि यांना त्यांची मदत मिळणार होती, असे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे.
अटक केलेला एक दहशतवादी मुंबईचा टॅक्सीचालकदिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया (४७) हा मुंबईतील सायन भागातील रहिवासी असून टॅक्सीचालक आहे. त्याच्या घरी कुटुंबियांची राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) तसेच गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. शेख हा सायन येथील सोशननगरमधील केलाबखार परिसरातील खोली क्रमांक १८५ मध्ये दोन मुली आणि पत्नीसोबत येथे राहतो. त्याच्या एका मुलीचे पदव्युत्तर शिक्षण झाले असून, दुसरी मुलगी शाळेत शिक्षण घेत आहे.