शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

"रिलायन्सवरील कारवाई पुढे नेण्यासाठी मोदी सरकार सत्तेत यावं लागलं, हाच काँग्रसचा काळा इतिहास"

By जयदीप दाभोळकर | Published: January 02, 2021 1:51 PM

भाजपा नेत्याचा काँग्रेसवर निशाणा

ठळक मुद्देसेबीने मुकेश अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला ठोठावला ४० कोटी रुपयांचा दंड२००७ मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडने शेअर बाजारात कथितरित्या गडबड केल्याचा आहे आरोप

जागतिक स्तरावर श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर असलेले उद्योगपती मुकेश अंबांनी यांना वर्षाच्या सुरुवातीलाच एका मोठ्या धक्क्यांला सामोरं जावं लागलं आहे. सेबीने मुकेश अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला (आरआयएल) एकूण ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण २००७ मधील असून २०१० मध्ये सेबीनं रिलायन्स इंडस्ट्रीजला नोटीस बजावली होती. परंतु त्यावर आता कारवाई करण्यात आली. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. "रिलायंस पेट्रोलियममध्ये झालेल्या अफरातफरीप्रकरणी सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीला नोटीस २०१० मध्ये बजावली. पण कारवाई झाली नाही. कारवाई पुढे सरकण्यासाठी मोदी सरकार सत्तेवर यावे लागले. हा काँग्रेसचा काळा इतिहास आहे," असं म्हणत भातखळकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर टीका केली.काय आहे हे प्रकरण?सन २००७ मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडने शेअर बाजारात कथितरित्या गडबड केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सेबीनं ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात 'आरआयएल'वर २५ कोटी आणि मुकेश अंबानी यांना १५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरपीएल आणि मुकेश अंबानी यांच्यासह नवी मुंबई सेज प्रायव्हेट लिमिटेडला २० कोटी रुपये आणि मुंबई सेज प्रायव्हेट लिमिटेडला अनुक्रमे १० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण नोव्हेंबर २००७ मधील असून, हे प्रकरण 'आरपीएल'ने शेअर बाजारातील रोख आणि वायदा बाजारातील खरेदी-विक्रीशी निगडीत आहे. मार्च २००७ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने आपला रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडमध्ये असलेला ४.१ टक्के समभाग विकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सूचीबद्ध असलेल्या या कंपनीचे सन २००९ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये विलिनीकरण करण्यात आले.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीcongressकाँग्रेसBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरRelianceरिलायन्स