पंजाब अँड महाराष्ट्र बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची सुमारे ७२ कोटी रुपयांची संपत्ती शुक्रवारी जप्त केली. पीएमसी बँक घोटाळ्यात ४ हजार ३३५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास करीत आरोपींची धरपकड सुरू केली. पीएमसी बँकेतील घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. यावरून आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी त्यांना टोला लगावला आहे."भाजपावर शरसंधान केल्याचा आव आणत रविंद्र वायकर यांनी PMC बँक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. घोटाळ्यात राजकीय नेते असल्याचा त्यांचा कयास अगदी योग्य होता, फक्त त्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला...," असं म्हणत भातखळकर यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरून वायकर यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र शेअर करत निशाणा साधला आहे.
“रविंद्र वायकरांचा फक्त नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला”
By जयदीप दाभोळकर | Published: January 02, 2021 3:31 PM
PMC Bank Fraud : भाजपा नेत्यानं लगावला टोला
ठळक मुद्देPMC बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते रविंद्र वायकरांनी पंतप्रधानांना लिहिलं होतं पत्र.चौकशीसाठी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स