शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

"... तर जनतेला राज्य सरकार 'माझा जीव माझी जबाबदारी' या तत्वावर जगावे असे सुचवत आहे का?"

By जयदीप दाभोळकर | Published: January 12, 2021 11:51 AM

भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयातील प्रकरणावरून भाजपा नेत्याचा सवाल

ठळक मुद्देअशानं नोकरशाही सोकावेल, भातखळकर यांचं वक्तव्यभंडारा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील आगीत १० चिमुकल्यांचा वेदनादायी अंत झाला होता

भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) १० चिमुकल्यांचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाल्यानंतरच कर्तव्यावर असलेले डॉक्टर, परिचारिका, अटेन्डंट, सुरक्षा रक्षक जागे झाले. हे स्पष्ट दिसून येत असतानाही कोणावरच अद्याप कारवाई झाली नाही. धक्कादायक म्हणजे, घटनेच्या दिवशी ‘एसएनसीयू’मध्ये कर्तव्यावर असलेल्यांची नावेही सांगण्यास अधिकारी तयार नाहीत. हे विदर्भातील एका बड्या नेत्याचा दबावामुळे होत असल्याचा आणि आता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

"भंडारा अग्निकांडातील दोषींना विदर्भातील एका बड्या नेत्याच्या दबावामुळे अजूनही चौकशी समिती समोरही येऊ दिले नसेल तर महाराष्ट्रातील जनतेला राज्य सरकार 'माझा जीव माझी जबाबदारी' या तत्वावर जगावे असे सुचवत आहे काय?. अशाने नोकरशाही सोकावेल हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे," असं म्हणत भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.  रुग्णालयातील ‘एसएनसीयू’ हा ‘इन बॉर्न युनिट’ व ‘आऊट बॉर्न युनिट’मध्ये विभागला आहे. ‘इन बॉर्न युनिट’मध्ये रुग्णालयात प्रसूती झालेल्या कमी वजनाची व इतरही आजारांची बालके ठेवली जातात, तर ‘आऊट बॉर्न युनिट’मध्ये रुग्णालयाबाहेर प्रसूती झालेली बालके ठेवली जातात. या दोन्ही युनिटमध्ये काचेची भिंत आहे. नियमानुसार या दोन्ही कक्षांत २४ तास डॉक्टर, परिचारिका, अटेंडंट व बाहेर सुरक्षा रक्षक असावे लागतात. कक्षात सोय नसेल, तर बाजूच्या काचेच्या कक्षातून नजर ठेवावी लागते.प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या रात्री तिथे डॉक्टर उपस्थित नव्हते. दोन परिचारिका व एक अटेंडंट होता. परिचारिका रात्री १० च्या सुमारास ‘एसएनसीयू’ला बाहेरून बंद करून झोपण्यासाठी बाजूच्या कक्षात निघून गेली. ‘आऊट बॉर्न युनिट’ला आगीला सुरुवात होण्यापासून ते तीन बालकांचा जळून, तर सात बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू होईपर्यंत कोणाचेच लक्ष गेले नाही. जेव्हा धूर ‘एसएनसीयू’मधून बाहेर येऊ लागला तेव्हा कुठे प्रशासन जागे झाले. यावरून कर्तव्यावर असलेल्यांचा कसूर स्पष्ट दिसून येतो. भंडारा अग्निकांड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. यातील दोषींवर कडक कारवाई केली जाणार, कुणालाच मुलाहिजा ठेवणार नसल्याचे शासन म्हणत असले तरी घटना होऊन ६० तास उलटून गेले आहेत. मागील दोन दिवसांपासून चौकशी समितीचे सदस्य भंडाऱ्यात तळ ठोकून आहेत. परंतु, दोषींना अद्यापही सामोर केलेले नाही. यासाठी एक नेता आपल्या अधिकारांचा गैरवापर करीत असल्याचेही बोलले जात आहे.

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगUddhav Thackerayउद्धव ठाकरेAtul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाShiv Senaशिवसेना