मुंबई: काल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावली होती.या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी फारुक अब्दुल्ला यांच्या भेटीबाबत माहिती दिली. फारुक अब्दुल्ला आता मला भेटले तेव्हा त्यांनी अजिबात घाबरु नकोस. लढ वडीलांसारखा लढ, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटी करुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
"बाळासाहेब आणि फारुक अब्दुल्ला यांची मैत्री होती... उध्दव ठाकरे, अब्दुल्ला दिवाळी दसरा मातोश्रीतच साजरा करायचे असेही सांगून टाकायचे", असं ट्विट अतुळ भातखळकर यांनी केले.
'अजिबात घाबरु नकोस, वडिलांसारखा लढ'; फारुक अब्दुल्लांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
उद्धव ठाकरेंनी काल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भाषण केलं. यावेळी त्यांनी फारुक अब्दुल्ला यांच्या भेटीबाबत माहिती दिली. फारुक अब्दुल्ला आणि माझी बऱ्याच दिवसांनी भेट झाली. यामागील दोन महत्त्वाची कारण देताना त्यांनी अब्दुल्ला यांचं वय झालं आहे असं सांगतानाच दुसरं कारण हे महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर फार दूर आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच फारुक अब्दुल्ला आता मला भेटले तेव्हा त्यांनी अजिबात घाबरु नकोस. लढ वडीलांसारखा लढ, असं सांगितलं, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
दरम्यान, जर छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते नक्कीच मुख्यमंत्री झाले असते", असं विधानही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं. "प्रत्येकाचंच वय वाढत असतं. पण बाळासाहेब सांगायचे वयानं माणूस मोठा होत असतो. पण ज्याक्षणी तो विचारांनी थकतो तो वृद्ध होतो. त्यामुळे छगन भुजबळ असो, फारुक अब्दुल्ला असोत किंवा मग शरद पवार अजूनही तरुण मनाची माणसं आहे. नुसतं तरुण मनाचं असून चालत नाही. तुमच्या मनात जिद्द असावी लागते एक इर्ष्या असावी लागते. ती या माणसांमध्ये आहे", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.