मुंबई : एल्गार परिषदेमध्ये हिंदू समजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शर्जिल उस्मानी (sharjeel usmani) प्रकरणावरून भारतीय जनता पक्ष (BJP) पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. झोपेचं सोंग घेतलेलं ठाकरे सरकार शर्जिल उस्मानीला अटक कधी करणार, असा सवाल करत या प्रकरणी शिवसेनेचंही बेगडी हिंदुत्व आणि सत्तेची लाचारी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. (bjp leader chandrakant patil slams shiv sena over sharjeel usmani issue)
नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; नारायण राणेंची मागणी
भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी एकामागून एक ट्विट करत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा दुतोंडी आणि हिंदू विरोधी चेहरा जनतेला माहित होताच, पण शरजील प्रकरणात शिवसेनेचंही बेगडी हिंदुत्व आणि सत्तेची लाचारी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
भविष्यात भाजप मोठे आंदोलन करेल
शर्जिलच्या अटकेसाठी प्रत्यक्षात या महाभकास आघाडी सरकारने अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले नसून शर्जिल उस्मानीला अटक झाल्यास त्याला त्वरित जामीन कसा मिळेल हेच या सरकाराचे प्राधान्य दिसत आहे. या लबाड सरकारने शर्जिल उस्मानीला तात्काळ अटक न केल्यास भविष्यात भाजपा याहूनही तीव्र आंदोलन करेल! हिंदूंचा अपमान भाजपा कधीही सहन करणार नाही!!, असे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
“१६ वर्षांनी सचिन वाझेंना परत घेताना पोलीस दलाची महान परंपरा धुळीस मिळेल हे लक्षात आलं नाही का?”
शर्जिलच्या अटकेसाठी राज्यभरात आंदोलने
हिंदू समाजाबद्दल विखारी वक्तव्य करणाऱ्या शर्जिल उस्मानीच्या अटकेसाठी आज (गुरुवारी) राज्यात विविध ठिकाणी भारतीय युवा मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. शर्जिलच्या मुसक्या आवळून आणणार असे छातीठोकपणे सांगणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निष्क्रियपणामुळे शर्जिलला अद्याप अटक करण्यात आली नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठामधील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने समाजात तेढ निर्माण करणारे विधान केल्याचा आरोप करण्यात आला असून, स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये त्याचा जबाब नोंदवण्यात आला. सुमारे तीन तास उस्मानीचा जबाब नोंदविण्याचे काम सुरु होते, अशी माहिती स्वारगेट पोलिसांकडून देण्यात आली आहे.