शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

"शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत, सांगा आता थोबाड कोणाचे फोडायचे? सरकारचे की..."; चित्रा वाघ भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 7:18 AM

डोंबिवलीच्या भोपर ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीवर ३३ जणांनी अत्याचार केला. त्या मुलीच्या अत्याचाराची व्हिडिओ क्लिप बनवून तिला ब्लॅकमेल केले. हे कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल त्यांनी केला.

डोंबिवली (ठाणे) : शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत सांगा आता थोबाड कोणाचे फोडायचे सरकारचे की, विरोधकांचे, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला असून, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत, अशी टीका केली. वाघ यांनी पोलीस ठाण्याला भेट देत घटनेची माहिती घेतली.

डोंबिवलीच्या भोपर ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीवर ३३ जणांनी अत्याचार केला. त्या मुलीच्या अत्याचाराची व्हिडिओ क्लिप बनवून तिला ब्लॅकमेल केले. हे कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणात तातडीने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न वाढले असून, राजकारण बाजूला ठेवून चर्चा करण्यास विशेष अधिवेशन बोलवण्याचे आदेश राज्यपालांनी दिले. त्याचे समर्थन देण्याऐवजी सरकारमधले जबाबदार नेते विरोधी पक्षावर टिपणी करून वेळ मारून नेत आहेत. राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले असताना आणखी किती मुलींचे, महिलांचे लचके तोडले जाणार आहेत, डोंबिवलीच्या घटनेत ३० जणांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले, या सरकारच्या काळात महिला सुरक्षित का नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

आतापर्यंतच्या घटना --  एप्रिल-२०१३ - डोंबिवलीतील १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार-  मे २०१४ - विधवा महिलेस कल्याणमध्ये घरात डांबून तिच्यावर सामूहिक बलात्कार-  सप्टें. २०१४ - कल्याण रेल्वे यार्डात एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार-  फेब्रु. २०१६ - कल्याणमधील वाडेघर परिसरात मुलीवर सामूहिक बलात्कार-  डिसें. २०१८ - डोंबिवलीत तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाचे लिंग कापल्याची घटना, तरुणाचा मृत्यू-  ऑगस्ट २०१९ - भाजप पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार-  फेब्रु. २०२० - डोंबिवलीत १४ वर्षांच्या मुलीवर वॉचमनचा बलात्कार-  जुलै २०२१ - कल्याणच्या रेल्वे यार्डात एका मूकबधिर मुलीवर बलात्कार-  फेब्रु. २०२१ - डोंबिवलीत जीम ट्रेनरकडून तरुणीवर बलात्कार-  मे २०२१ - डोंबिवलीत मामाचा नऊ वर्षीय भाचीवर बलात्कार-  सप्टें. २०२१ - १४ वर्षीय मुलीवर उल्हासनगर स्कायवॉकवर बलात्कार 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMolestationविनयभंग