सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठं वादंग निर्माण झालं होतं. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी सोमवारी राज्यभर भाजप महिला मोर्चातर्फे आंदोलनही करण्यात आलं होतं. परंतु आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. दरम्यान, यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया देत तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. "रेणू शर्मांनी धनंजय मुंडेंवर बलात्कारासारखा गंभीर आरोप केला होता. परंतु आता त्यांनी तो मागे घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडेंवर ज्यावेळी बलात्काराचा आरोप झाला हे आमच्यासाठीही तितकंच धक्कादायक होतं. आज ज्या पद्धतीनं तक्रार मागे घेतली गेली हेदेखील तितकंच धक्कादायक आहे," असं चित्रा वाघ म्हणाल्या. पहिल्या दिवसापासून भाजपची भूमिका होती ती स्पष्ट होती. आमच्यासाठी हे प्रकरण धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांच्यापुरतं मर्यादित नव्हतं. आम्ही चुकीचं उदाहरण महाराष्ट्रापुढे जाऊ देणार नाही ही आमची भूमिका होती आणि म्हणून आम्ही त्यांचा राजीनामाही मागितला होता, असंही त्या म्हणाल्या.
खोटे आरोप केल्याप्रकरणी रेणू शर्मांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी; चित्रा वाघ यांची मागणी
By जयदीप दाभोळकर | Published: January 22, 2021 9:36 AM
रेणू शर्मा यांनी कौटुंबिक कारणामुळे तक्रार मागे घेत असल्याचं पोलिसांना सांगितलं
ठळक मुद्देरेणू शर्मा यांनी कौटुंबिक कारणामुळे तक्रार मागे घेत असल्याचं पोलिसांना सांगितलंचित्रा वाघ यांच्याकडून रेणू शर्मांवर कारवाई करण्याची मागणी