मुंबई: काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कोरोना आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत त्यांनी इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित करुन बिगर भाजपशासित राज्य सरकारांना सुनावलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जीएसटीचा वाटा केंद्राने अद्याप दिलेला नसल्याची टीका केली. यावर आता भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.
'तुम्हाला कळत नसेल तर...'उद्धव ठाकरेंनीजीएसटीच्या वाट्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना चित्रा वाघ म्हणतात की, "काही दुकानात पाटी असते, येथे कामगारांना रोज पगार दिला जातो. तशी येथे राज्यांना रोज जीएसटी दिला जातो, अशी पाटी पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर लावावी अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अपेक्षा आहे का? जीएसटी परिषदेचे सदस्य महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आहेत. आपल्याला कळत नसेल तर त्यांना विचारा की मुख्यमंत्रीजी," अशी टीका वाघ यांनी केली आहे.
काय म्हणाले होते नरेंद्र मोदी ?27 एप्रिल रोजी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीत मोदींनी भाजपेतर राज्यांची यादी देत इंधनावरील करामध्ये कपात न करण्याच्या त्यांच्या निर्णयावर टीका केली. यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, झारखंड या राज्यांचा समावेश आहे.
उद्धव ठाकरेंची केंद्रावर टीकाबैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर सडकून टीका केली होती. "देशाच्या एकूण थेट करात एकट्या महाराष्ट्राचा वाटा 38 टक्के असतानाही राज्याला केंद्रीय कराच्या केवळ 5.5 टक्के रक्कम मिळते. संपूर्ण देशात सर्वात जास्त 15 टक्के जीएसटी संकलन राज्यातून होते. तरीदेखील राज्याच्या हक्काचे जीएसटीचे सुमारे 26 हजार 500 कोटी रुपये केंद्राने थकविले आहेत. देशाच्या विकासात सर्वाधिक योगदान देणाऱ्या महाराष्ट्रावर केंद्राकडूनच सातत्याने अन्याय केला जातोय'', अशी टीका ठाकरेंनी केली होती.