अमरावती: काही दिवसांपूर्वी राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेनंतर हिंसाचार घडला. यानंतर आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीतील हिंसेचाराचा आढावा घेतला. हिंसाचारात नुकसान झालेल्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
आमरावतीच्या पालकमंत्री गप्पपत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'राज्यातील काही भागात 12 तारखेला हिंसाचार भडकला आणि त्याची रिअॅक्शन 13 तारखेला उमटली. पण 12 तारखेच्या घटनेबाबत कुणीच बोलत नाही, फक्त 13 तारखेच्या घटनेवर अधिक जोर दिला जातोय. 12 तारखेच्या घटनेवर का बोललं जात नाही? त्या हिंसेमागे कोण होतं? अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर त्यावर गप्प का आहेत? असे अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारले.
कारवाई फक्त 13 तारखेच्या घटनेवरुनतु पुढे म्हणाले की, 'आम्ही कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही, पण 12 तारखेची घटना डिलीट करुन 13 तारखेच्या घटनेवर बोलत आहेत. सर्व कारवाई 13च्या घटनेवर सुरू आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर काहीच बोलत नाहीत. विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट करणे आम्हाला मान्य नाही, पण चुकीच्या घटनेवर भर दिला जातोय. 12 तारखेच्या घटनेवर सत्ताधारी काहीच बोलायला तया नाही, मतांचे ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न नाही ना? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
एकाच वेळी मोर्चे कसे निघाले ?फडणवीस पुढे म्हणाले, चुकीच्या माहितीच्या आधारे मोर्चे काढण्यात आले. कुराण शरीफ जाळण्यात येत असल्याचा व्हिडिओ दाखवण्यात आला, पण तो व्हिडीओ दिल्लीच्या कॅम्पमधील होता. त्याचवेळी पाकिस्तानातील फोटो व्हायरल झाला. मोठ्या हिंसाचारासाठी समाजाला भडकवण्यता आलं. एकाच वेळी विविध शहरातून एवढे मोठे मोर्चे कसे निघाले ? यावरुन हा सुनियोजित कट होता हे दिसून येतं, असंही ते म्हणाले.