नागपूर - भाजप नेते नारायण राणे यांच्या अटक आणि जामिन प्रकरणापासूनच राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघत आहे. आता शिवसेना नेते, राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्तनागिरीचे पालक मंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) नोटीस बजावली आहे. त्यांना ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर, या नोटिशीला आपण कायदेशीर उत्तर देऊ, असे परब यांनी म्हणटले आहे. आता यावर विरोधी पक्षने देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (BJP leader Devendra Fadnavis commented on Anil Parab ED Notice)यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, अनिल परब यांना ईडीची नोटीस मिळाली की नाही, यासंदर्भात आपल्याला कसल्याही प्रकारची माहिती नाही. मात्र, ईडी असो किंवा सीबीआय हे त्यांच्या पद्धतीने आणि कायदेशीरपणेच काम करत असतात, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. खरे तर, १०० कोटी वसुली व बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने एनआयए कोठडीतून लिहिलेल्या पत्राच्या अनुषंगाने परब यांना समन्स पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यासाठी साधलेल्या ‘टायमिंग’मुळे चर्चेला उधाण आले आहे.
ईडीची नोटीस आली, पण...; परिवहन मंत्री अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया
अनिल देशमुख प्रकरणावर फडणवीसांचे भाष्य -फडणवीस यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंदर्भातही भाष्य केले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याच्या बातम्या रविवारी सकाळपासून माध्यमांमध्ये पसरल्या होत्या. यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर तोंडसुख घ्यायलाही सुरुवात केली होती. यानंतर यावर सीबीआयनेही स्पष्टीकरण दिले. हाच धागा धरत फडणवीस म्हणाले, अशा बातम्या पेरून काहीच होणार नाही. सीबीआयने आता यावर स्पष्टीकरण दिलेले आहे. एफआयआर रद्द व्हावा म्हणून जो खटाटोप चालला, त्याला अपयश आले आहे. प्रकरण कोणतेही असोत जे काही व्हायचं ते कायद्यानेच व्हायला हवे, असे आमचे म्हणणे आहे. हा कुणा एका व्यक्तीचा प्रश्न नाही तर कायद्याचा प्रश्न आहे. यामुळे खोट्या बातम्या पेरून कोणाचाही फायदा होणार नाही. सीबीआयचे काम कायदेशीर चौकटीत राहूनच सुरू असते. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.परब यांना नोटीस मिळताच राऊत म्हणाले... - "शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहे. क्रोनोलॉजी कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू...जय महाराष्ट्र", असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.