शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

Exclusive: निष्ठावंत दिलीप गांधींचं तिकीट सुजय विखेंना देण्यामागे (महा)'जन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 2:54 PM

गिरीश महाजनांनी सांगितलं विखेंच्या पक्षप्रवेशामागचं कारण

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते भाजपावासी होत आहेत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांच्या मुलांचा भरणा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतील तरुण नेते भाजपामध्ये जात असल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना मुलं पळवणारी टोळी म्हटलं होतं. याशिवाय निवडणूक जवळ आल्यानं भाजपामध्ये दाखल झालेल्यांना तिकीट मिळाल्यानं निष्ठावंत नाराज झाले. यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लोकमतच्या फेसबुक लाईव्हमध्ये भाष्य करत पक्षाची बाजू मांडली.काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील, राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये दाखल झाले. सुजय यांना उमेदवारी दिल्यानं नगरचे खासदार दिलीप गांधी यांचं तिकीट कापलं गेलं. त्यामुळे गांधी नाराज झाले. यावर भाष्य करताना जनतेचं ऐकूनच आम्ही निर्णय घेतल्याचा दावा महाजन यांनी केला. 'उमेदवारी देत असताना आम्ही लोकांच्या मतांचा विचार करतो. नगरमध्ये केलेल्या सर्वेक्षणात गांधींविषयी नाराजी असल्याचं लक्षात आलं. तीन-तीन सर्वेक्षणांमधून हीच गोष्ट समोर आली. त्यातच सुजय यांना उमेदवारी हवी होती. मात्र तो मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्यानं त्यांना तिकीट मिळत नव्हतं. त्यामुळेच आम्ही त्यांना उमेदवारी दिली,' असं महाजन यांनी सांगितलं.अनेकांना भाजपामध्ये येण्याची इच्छा आहे. लोकांचा भाजपामध्ये ओढा आहे, असं महाजन म्हणाले. 'अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यत भाजपाचा प्रभाव आहे. त्यामुळेच अनेकांना भाजपामध्ये येण्याची इच्छा आहे. निष्ठावंतांचं योगदान विसरता येणार नाही. त्यांच्यामुळेच पक्ष आज इथपर्यंत पोहोचला. पण अनेकदा पक्षाच्या विस्तारासाठी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रवेश दिला जातो. पक्षाच्या वाढीसाठी काही चेहरे गरजेचे असतात,' अशा शब्दांमध्ये महाजन यांनी भाजपामधील वाढत्या इनकमिंगचं समर्थन केलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSujay Vikheसुजय विखेDilip Gandhiखा. दिलीप गांधीGirish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाcongressकाँग्रेस