सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा परिस्थितीत आता लसीकरणाचाही पर्याय वापरला जात आहे. १ मे पासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी आपल्या नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या मोफत लसीकरणासाठी आग्रही असल्या तरी राज्यातील काँग्रेसचे नेते सत्तेसाठी लाचार असल्याची घाणाघाती टीका केली आहे. "वसूलीच्या मासिकतेचं असलेलं सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेताना किंवा पैसे खर्च करताना यांचे हात थरथर कापतायत. कोरोनातून बाहेर पडण्यासाठी लसीकरणाची मोहीम जास्तीतजास्त राबवणं हा एकमेव पर्याय आहे. असं असताना लसीकणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार ठामपणे कोणतीही भूमिका घेत नाही. मंत्रिमंडळात मोफत लसीकरणावरून तू तू मै मै सुरू आहे," असं पडळकर म्हणाले."महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारनं मोफत लसीकरण केलं पाहिजे यासाठी सोनिया गांधी आग्रही आहेत. परंतु महाराष्ट्रातले मंत्री दोन्ही पक्षांपुढे नांगी टाकून बसले आहे. त्यांचं राज्य सरकारसमोर काही चालत नाही अशी परिस्थिती आहे. काँग्रेसचे मंत्री सत्तेपुढे लाचार झाले आहेत. सोनिया गांधींचंही ते ऐकत नाहीत अशी परिस्थिती राज्यात दिसत आहे," असंही ते म्हणाले.
"सोनिया गांधी मोफत लसीकरणासाठी आग्रही, राज्यातील नेते दोन पक्षांपुढे नांगी टाकून बसलेत"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 2:23 PM
Corona Vaccination Maharashtra : आमदार गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका. १ मेपासून देशभरात राबवण्यात येणार आहे व्यापक लसीकरण मोहीम
ठळक मुद्दे१ मेपासून देशभरात राबवण्यात येणार आहे व्यापक लसीकरण मोहीमकाँग्रेस नेते सत्तेपुढे लाचार, पडळकर यांची टीका